एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Share Market : शेअर बाजार काल कोसळला, आज सावरला; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला

share market updates : सोमवारच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजार चांगलाच वधारला.

Stock Market Opening: सोमवारी मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यानंतर आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. बीएसईचा 30 स्टॉकचा सेन्सेक्स वधारला असून 600 अंकांनी वधारला आहे. तर, निफ्टीतही जवळपास 150 अंकांनी वधारला आहे. मेटल आणि आयटी क्षेत्रात चांगली खरेदी झाल्याचे दिसून आले. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्सने 400 अंकाची उसळण घेतली. 

सोमवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. एकाच दिवसात जवळपास 9 लाख कोटींचा चुराडा झाला होता. ओमायक्रॉन बाधितांची वाढती संख्या, लॉकडाउनची टांगती तलवार, परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी केलेली विक्री आदी कारणांमुळे बाजारात घसरण झाल्याचे म्हटले जाते. 

मंगळवारी देखील बाजार सुरू होण्याआधी गुंतवणुकदार धास्तावले होते. मात्र, सकाळच्या सत्रात शेअर बाजारात तेजी दिसून आली. सकाळी 10.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 850 अंकांनी वधारून 56,672 अंकावर पोहचला होता. तर, निफ्टीदेखील 252 अंकांनी वधारून 16,866 अंकावर पोहचला होता. निफ्टीमधील 50 पैकी 49 स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांकातही तेजी दिसून आली. सोमवारच्या तुलनेत आज मंगळवारी बाजार चांगलाच वधारला. 

निफ्टीमधील धातू, सार्वजनिक बँक, रियल्टी आणि कंझ्यूमर ड्यूरेबल्समध्ये दोन ते 2.25 टक्क्यांदरम्यान ट्रे़डिंग सुरू आहे. त्याशिवाय आयटी क्षेत्रातही तेजी दिसून आली. 

Share Market : शेअर बाजार काल कोसळला, आज सावरला; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला

आशियाई बाजारात काय स्थिती?

आज आशियाई शेअर बाजारामध्ये सोमवारपेक्षा मंगळवारी चांगली परिस्थिती दिसून येत आहे. जपानच्या निक्केई दोन टक्क्यांनी वधारला आहे. तर, हँगसेंग हा 0.88 टक्क्यांनी वधारला आहे. तैवान इंडेक्समध्ये 0.54 टक्क्यांनी वधारला आहे. कोरिया आणि चीनच्या कम्पोजिटचे निर्देशांक वधारले असल्याचे दिसून आले. 

दरम्यान सोमवारी, शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चा अनुभव आला. एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या तब्बल 9 लाख कोटीहून अधिक रुपयांचा चुराडा झाला आहे. सेंसेक्समध्ये तब्बल 1189 अंकांची म्हणजे 2.09 टक्क्यांची घसरण झाली. तर निफ्टीमध्येही 371 अंकांची म्हणजे 2.18 टक्क्यांची घसरण झाली. जगभरातल्या विविध शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या घसरणीचा परिणाम मुंबई शेअर मार्केटवरही झाल्याचे दिसून आले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi Voting : प्रशासनाचा विरोध डावलून आज मारकडवाडीत मतदानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
Embed widget