Stock Market Updates : सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात, आयटी, बँकिंगमध्ये घसरण
Stock Market Updates : शेअर बाजारात सोमवारी सकाळी घसरण दिसून आली. जोरदार विक्रीमुळे शेअर बाजार 300 अंकांनी घसरला.
Stock Market Updates : जागतिक शेअर बाजारातील नकारात्मक संकेताचा परिणामभ भारतीय शेअर बाजारावरही दिसून आली. सोमवारी, सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली. आज प्री-ओपनिंग सत्रातही बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स 423.48 अंकांनी घसरत 59,023.70 या पातळीवर व्यवहार करत होते. त्याशिवाय, निफ्टी निर्देशांकात 105.65 अंकांच्या घसरणीसह 17,678.70 अंकावर व्यवहार करत होता.
जागतिक शेअर बाजारात संमिश्र ट्रेंड दिसून आला. अमेरिकन शेअर बाजारात डाओ जोंसमध्ये तेजी दिसून आली. डाओ 37 अंकांनी वधारत बंद झाला होता. त्याशिवाय, आशियाई बाजारातही फारसा उत्साह दिसून आला नाही. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास 362.71 अंकांनी घसरला होता. तर, निफ्टीमध्ये 95.60 अंकाची घसरण दिसून आले.
आज TCS चे तिमाही निकाल
आडज आयटी सेक्टरवर विशेष लक्ष असणार आहे. टीसीएस आज आपल्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर करणार आहे. इतर, इन्फोसिसदेखील या आठवड्यात आपला तिमाही निकाल जाहीर करणार आहे.
सेन्सेक्समधील 30 शेअर्समध्ये 10 स्टॉक्समध्ये तेजी दिसून येत आहे. तर 20 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. इन्फोसिसमध्ये विक्रीचा दबाब असल्याचे दिसत आहे. इन्फोसिसमध्ये 1.85 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. तर, एनटीपीसीच्या शेअर दरात 1.09 टक्क्यांच्या तेजीसह ट्रेंड करत आहे.
त्याशिवाय, शेअरच्या दरात एनटीपीसी शिवाय पॉवर ग्रीड, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, अल्ट्रा केमिकल आणि सन फार्माचे शेअर वधारले आहेत.
इन्फोसिसशिवाय, एचसीएल टेक, विप्रो, एचयूएल, रिलायन्स, एचडीएफसी बँक, एलटी, एचडीएफसी, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, टाटा स्टील, कोटक बँक, मारूती, अॅक्सिस बँक आदींचे शेअर घसरले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Post Office : पोस्टात फक्त ₹ 100 मधून गुंतवणूक सुरू करण्याचा पर्याय तुम्हाला माहिती आहे? जाणून घ्या
- Electric vehicles: देशात इलेक्ट्रिक कार तेजीत, गेल्या आर्थिक वर्षात EV च्या विक्रीत तीन पटीने वाढ