Stock Market Updates: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम कायम; सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला
Share Market updates : रशिया युक्रेन युद्धाची झळ शेअर बाजारालाही बसत आहे. सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला आहे.
Share Market updates : शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात झाली. जागतिक शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही झाला आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर होत असल्याचे म्हटले जात आहे. मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती.
शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स आज 618 अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टी 200 अंकांनी घसरला. सेन्सेक्स 55,629 वर सुरू झाला तर, निफ्टी 16593 अंकांवर सुरू झाला.
सकाळी 10.12 वाजता सेन्सेक्स 801 अंकांनी तर, निफ्टी 196 अंकांनी घसरला होता. शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम आहे.
बीएसईच्या या क्षेत्रांमध्ये घसरण
बीएसईच्या धातू, तेल आणि गॅस, ऊर्जा, आरोग्यसेवा, ऑटो आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये खरेदीचे संकेत मिळत आहेत. तर, वाहन आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण दिसत आहे.
बँक निफ्टीत घसरण
शेअर बाजार सुरू झाला तेव्हा बँक निफ्टीत 800 अंकांची घसरण दिसून आली. मात्र, त्यानंतर बँक निफ्टी काही प्रमाणात सावरला.
दरम्यान, सोमवारी सकाळी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. सेन्सेक्स जवळपास 1000 अंकांनी कोसळला होता. त्यानंतर बाजार सावरला. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 388 तर, निफ्टी 129 अंकांनी वधारला होता. मंगळवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शेअर बाजारात सुट्टी होती. सोमवारी बाजार बंद होताना खरेदीचा ट्रेंड दिसून आला होता. बुधवारी सकाळी मात्र, विक्रीचा सपाटा सुरू झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेन युद्धाने मद्यप्रेमींची 'झिंग' उतरणार? बीअरचे दर वाढण्याची भीती
- Fuel Price : इंडियन ऑइलचा झटका; 'या' देशात पेट्रोलच्या दराचे द्विशतक, भारताचे काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha