व्होडाफोन आयडियाचा शेअर सुस्साट, 'बाय रेटिंग'मुळे चक्क 10 टक्क्यांची वाढ; भविष्यातही गुंतवणूकदार होणार मालामाल?
सध्या व्होडाफोन आयडियाच्या शेअरला बाय रेटिंग देण्यात आले आहे. त्यामुळेच सध्या या शेअरमध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे.
![व्होडाफोन आयडियाचा शेअर सुस्साट, 'बाय रेटिंग'मुळे चक्क 10 टक्क्यांची वाढ; भविष्यातही गुंतवणूकदार होणार मालामाल? share market update vodafone idea share raised by ten percentage may increase price in future व्होडाफोन आयडियाचा शेअर सुस्साट, 'बाय रेटिंग'मुळे चक्क 10 टक्क्यांची वाढ; भविष्यातही गुंतवणूकदार होणार मालामाल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/24/603a8de4c4dd2434256c35f2ecdaebf91716534717798988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सध्या शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे सध्या ही अस्थिरता दिसत आहे. मात्र या अस्थिरतेत व्होडाफोन आयडियाचा शेअर मात्र सर्वच गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतोय. आगामी काळात या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळऊ शकते. कारण परदेशी ब्रोकरेज हाऊस (UBS) ने या कंपनीच्या रेटिंगमध्ये बदल केला आहे. यूबीएसने वर्षभरात पहिल्यांदाच व्होडाफोन आयडीयाच्या शेअरला बाय रेटिंग दिलं आहे. याआधी व्होडाफोन आयिडाला न्यूट्रल असे रेटिंग दिले होते. मात्र बऱ्याच प्रतिक्षेनंतर या कंपनीला बाय रेटिंग मिळाल्यामुळे शेअर बाजारात हा स्टॉक भविष्यात चांगलीच झेप घेण्याची शक्यता आहे.
या कंपनीचे बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक
सध्या म्हमजेच शुक्रवारी व्होडाफोन आयडिया कंपनीचा शेअर मुंबई शेअर बाजारावर दहा टक्क्यांच्या तेजीसह 15.45 रुपयांवर ट्रेंड करत आहे. त्याचाच परिणाम म्हणून हा शेअर आपल्या सार्वकालिक उच्चांकावर जाऊन पोहोचला आहे. व्होडाफोन आयडियाचे बाजार भांडवल सध्या 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे.
व्होडाफोन आयडीयाचा शेअर 18 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता
विदेशी ब्रोकरेज हाउस यूबीएसच्या म्हणण्यानुसार व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) या कंपनीचा शेअर आगामी काळात 18 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच गुरुवारच्या (24 मे) तुनलेत या टेलकॉम कंपनीच्या शेअरमध्ये साधारण 30 टक्क्यांची तेजी पाहायला मिळू शकते. यूबीएसच्या म्हणण्यानुसार व्होडाफोन आयडियाला थकबाकी भरण्यास आणखी मुदत मिळू शकते. तसे झाल्यास या शेअरमध्ये साधारण 70 ते 80 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. काही दिवसांपूर्वी व्होडाफोन आयडिया या कंपनीने फॉलो-ऑन पब्लिक ऑफरच्या माध्यमातून 18000 कोटी रुपये गोळा केले होते.
एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 110 टक्क्यांनी वाढ
व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या एका वर्षांपासून 110 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 24 मे 2023 रोजी या कंपनीचा शेअर 6.96 रुपयांवर होता. हाच शेअ 24 मे 2024 रोजी 14.58 रुपयांवर पोहोचला. गल्या दोन वर्षांत व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये साधारण 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू वर्षांत मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये 13 टक्क्यांनी घट झाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांतील सार्वकालिक उच्चांकी मूल्य 18.42 रुपये आहे. तर 52 आठवड्यांतील सर्वांधिक कमी मूल्य 6.87 रुपये आहे.
हेही वाचा :
EPFO कडून एक नव्हे तर दिली जाते सात प्रकारची पेन्शन, जाणून घ्या सविस्तर
चार महिन्यांत भारत सरकारने खरेदी केलं तब्बल 24 टन सोनं, तिजोरीतील सोन्याचा साठा 827 टनांवर!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)