Share Market : सोलर पंप बनवणाऱ्या कंपनीचा शेअर सहा दिवसात 27 टक्क्यांनी वाढला, बड्या गुंतवणूकदारांनी लावले कोट्यवधी रुपये
Ravindra Energy : रवींद्र कंपनीच्या शेअरमध्ये सलग सहाव्या दिवशी अप्पर सर्किट लागलं आहे. कंपनीच्या शेअरमध्ये एका आठवड्यात 27 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबई : सोलर एनर्जी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. सोलर पंप क्षेत्रातील कंपनी रवींद्र एनर्जीच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी आली आहे. रवींद्र एनर्जीचा शेअर आज देखील 5 टक्क्यांनी वाढला. आज रवींद्र एनर्जीचा शेअर अपर सर्किटसह 104. 55 रुपयांवर पोहोचला. रवींद्र एनर्जीच्या शेअरमध्ये गेल्या सहा दिवसांपासून अपर सर्किट लागलेलं आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात 27 टक्के अधिक तेजी आली आहे. दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचौलिया आणि मुकुल अग्रवाल यांनी रवींद्र एनर्जीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत लाखो शेअर्स खरेदी केले आहेत.
रवींद्र कंपनीच्या बोर्डानं प्राधान्यक्रम तत्वावर 179.99 कोटी रुपयांच्या उभारणीला मंजूर दिली असल्याचं म्हटलं. कंपनीनं 2.43 कोटी शेअर इश्यू करण्यास मंजुरी दिली आहे. बीएसईवरील फायलिंगवरील अलॉटी लिस्ट नुसार आशिष कचौलिया यांना 15,54,054 इतके शेअर्स देण्यात आले आहेत. याचं मूल्य जवळपास 12 कोटी रुपये असल्याचं समोर आलं आहे. तर, मुकुल अग्रवाल यांना 21,62,162 शेअर ऑफर करण्यात आले आहेत. त्यांनी कंपनीत 16 कोटी रुपये गुंतवणूक केल्याची माहिती आहे. रवींद्र एनर्जी कंपनी सोलर पंप बनवते. याशिवाय सोलर जनरेशन पॉवर प्लांट देखील उभारत आहे.
रवींद्र एनर्जीच्या गेल्या आठवड्यापासून 27.60 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या तीन महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 63 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा 11 जून 2024 ला शेअर 64.47 रुपयांवर होता. कंपनीचा 12 सप्टेंबरला शेअर 104.55 रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीला कंपनीचा शेअर 62.05 रुपयांवर होता आता तो 104 रुपयांवर आहे. रवींद्र एनर्जीचा 52 आठवड्यामध्ये शेअर उचांकी पातळीवर 104 रुपयांवर आहे तर निचांकी पातळीवर 51.66 रुपयांवर होता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
इतर बातम्या :