एक्स्प्लोर

RBI : मोठी बातमी! देशातील दोन बड्या बँकांना RBI चा दणका, कोट्यावधी रुपयांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

बँकिंग क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ (RBI) ने देशातील दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई केली आहे.

Reserve Bank of India : बँकिंग क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ (RBI) ने देशातील दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक (HDFC) ॲक्सिस बँकेला (Axis Bank) नियमांचे पालन न केल्याबद्दल कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबतचे प्रसिद्धपत्रक देखील देण्यात आलं आहे.

एचडीएफसी बँक ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. तर दुसरी ॲक्सिस बँक आहे. मध्यवर्ती बँकेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने दोन्ही बँकांवर ही कारवाई केली आहे. अशा परिस्थितीत जर तुमचेही या बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आरबीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून या संदर्भात माहिती दिली आहे.

दोन्ही बँकांना 2.91 कोटी रुपयांचा दंड 

दोन्ही बँकांवर 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात निष्काळजीपणा करणाऱ्या सर्व लहान-मोठ्या बँकांवर कठोर कारवाई सुरूच ठेवली आहे. बँकांकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये निष्काळजीपणाची प्रकरणे समोर आल्यानंतर दंडाची ही कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. यामध्ये केवायसी, ठेवींवरील व्याजदर आणि इतर बाबींचाही समावेश आहे.

ॲक्सिस बँकेला का ठोठावला दंड ?

रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेवर सर्वाधिक दंड ठोठावला आहे, जो 1.91 कोटी रुपये आहे. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, 1949 (बीआर ॲक्ट) च्या कलम 19 (1) (ए) च्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला असल्याचे त्यात म्हटले आहे. याशिवाय ठेवींवरील व्याजदर, केवायसीसह कृषी कर्जाशी संबंधित काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल ॲक्सिस बँकेला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

HDFC बँकेवर का केली कारवाई?  

रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रसिद्धी पत्रकात असे सांगण्यात आले की, एचडीएफसी बँकेवर ठेवीवरील व्याजदर, बँकेशी संबंधित वसुली एजंट आणि बँक ग्राहक सेवेसाठी निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल दंड आकारण्याची कारवाई करण्यात आली आहे.

बँक ग्राहकांवर परिणाम होणार का?

एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँकेवर लावण्यात आलेल्या दंडाच्या माहितीसोबतच, बँकांच्या ग्राहकांवर याचा काय परिणाम होणार का?  असा सवाल उपस्थित केला जात आहे. वैधानिक आणि नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. यामुळे बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर परिणाम होणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ganesh Visarjan Vadapav : गणेश विसर्जन मिरवणुकीत 5 लाख वडापावचं होणार वाटप ABP MAJHAABP Majha Headlines : 06 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Tambdi Jogeshwari Ganpati : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं नटेश्वर घाटावर विसर्जनPraniti Shinde on Ganpati Visarjan : सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदेंनी केले बाप्पाचे विसर्जन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
ह्रदयद्रावक... विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; चितोड गावात शोककळा
ह्रदयद्रावक... विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; चितोड गावात शोककळा
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
Embed widget