Share Market Opening : शेअर बाजार वधारला, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची उसळण
Share Market Opening : भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसत आहे. फेडरल रिझर्व्हकडून अपेक्षित असलेली व्याज दरवाढ झाल्यानंतर बाजारावरील दबाव हटला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Share Market Opening : भारतीय शेअर बाजाराची आज चांगली सुरुवात झाली. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याज दरात वाढ केल्यानंतरही आज भारतीय शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला आहे. शेअर बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले.
आज बाजारातील व्यवहाराला सुरुवात होताच, बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्सने 53 हजाराचा टप्पा ओलांडला. सेन्सेक्सची सुरुवात 477.52 अंकांच्या उसळणीसह झाला. एनएसई निर्देशांक निफ्टी 140.10 अंकांनी वधारत 15832 अंकांवर खुला झाला.
आज शेअर बाजार खुला झाला तेव्हा सुरुवातीच्या काही मिनिटातच सेन्सेक्सने 500 अंकांचा टप्पा ओलांडला. सकाळी 9.20 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 503.78 अंकांनी वधारत 53,045.17 अंकांवर व्यवहार करत होता.
आज निफ्टीतील सर्व क्षेत्रातील सूचकांक (Index) वधारले आहेत. मीडिया सूचकांक सर्वाधिक वधारला आहे. तर, पीएसयू बँक शेअर दरात 1.11 टक्क्यांनी वधारला आहे. रिअल्टी, मेटल, ऑटो आणि वित्तीय सेवा आदींच्या शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसत आहे.
निफ्टीमध्ये रिलायन्सच्या शेअरमध्य 1.91 टक्के, मारुती शेअर 1.56 टक्के आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 1.24 टक्क्यांची वाढ दिसत आहे. बजाज फायनान्स 1.18 टक्क्यांनी वधारला आहे. तर, अपोलो रुग्णालय शेअर दरात 1.13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.