(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening : शेअर बाजारात विक्रीचा दबाव; सेन्सेक्सची 300 अंकांच्या घसरणीसह सुरुवात
Share Market Opening : शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आजही घसरणीसह झाली. शेअर बाजारावर विक्रीचा दबाव असल्याचे दिसून आले आहे.
Share Market Opening : भारतीय शेअर बाजाराची आजही घसरणीसह सुरुवात झाली आहे. अमेरिकन शेअर बाजार आणि आशियाई शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये 300 अंकांची आणि निफ्टीत 100 अंकांची घसरण दिसून आली आहे.
आजही शेअर बाजारावर विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे. बीएसई निर्देशांक सेन्सेक्समध्ये 336 अंकांनी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. तर, एनएसई निर्देशांक निफ्टीमध्ये 104 अंकांची घसरण दिसून येत आहे. निफ्टी 16246 अंकांवर व्यवहार करत आहे.
आज ऊर्जा क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात विक्रीचा दबाव आहे. बँकिंग, ऑटो, आयटी, एफएमसीजी, मेटलच्या शेअर दरात घसरण असल्याचे दिसून आले आहे. आयटी शेअर्समध्ये चौफेर विक्री सुरू आहे. निफ्टीतील 50 पैकी 41 शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. तर, 9 शेअर्समध्ये खरेदी सुरू आहे. सेन्सेक्समधील 30 शेअरपैकी 27 शेअरमध्ये घसरण असल्याचे दिसून येत आहे.
आज निफ्टीमध्ये डॉ. रेड्डीज लॅबच्या शेअर दरात 2.15 टक्के, रिलायन्सच्या शेअर दरात 0.86 टक्के, सन फार्मामध्ये 0.67 टक्के, इन्फोसिसमध्ये 0.22 टक्के, एनटीपीसीच्या शेअर दरात 0.19 टक्के आणि टेक महिंद्रामध्ये 0.02 टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, बुधवारी रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात वाढ केल्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आला होता. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 214 अंकांनी, तर निफ्टीही 60 अंकांनी घसरला होता. सेन्सेक्समध्ये 54,892 अंकांवर, तर निफ्टी 16,356 अंकांवर बंद झाला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Crude Oil Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ; 123 डॉलर प्रति बॅरल दर
- Explainer RBI Rate Hike: महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याज दरवाढ कशी करते मदत? जाणून घ्या
- RBI Press Conference Highlights : रेपो दरात वाढ ते महागाईचे आव्हान, आर्थिक विकास; रिझर्व्ह बँकेच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे