Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही अस्थिरता? सेन्सेक्सची घसरणीसह सुरुवात
Share Market Opening Bell: शेअर बाजारातील आजच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली.
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव असल्याचे चित्र (Share Market Opening Bell) आहे. शेअर बाजारातील आजच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. प्री-ओपनिंग सत्रात घसरण झाली होती. त्यानंतरच्या काही वेळेत बाजार सावरला. आज शेअर बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता आहे.
आज बाजारात सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराचा निर्देकांक सेन्सेक्स 177.98 अंकांच्या घसरणीसह 58,853 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 52.05 अंकांच्या घसरणीसह 17525 अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजार काही प्रमाणात सावरल्याचे चित्र होते. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 152 अंकांच्या घसरणीसह 58,878.53 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 40 अंकाच्या घसरणीसह 17,536.90 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्समधील 30 पैकी 7 शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसत आहे. तर, 23 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. तर, निफ्टीतील 50 पैकी 16 शेअरमध्ये तेजी असल्याचे चित्र असून 33 शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आहे. बँक निफ्टीतही 20 अंकांची घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टी 38677 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
आज शेअर बाजारात इंडजसइंड बँक, आयटीसी, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसीच्या शेअरमध्ये जोर दिसत आहे.
पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, विप्रो, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे.
मंगळवारी बाजार सावरला
मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली होती. मात्र, काही वेळानंतर बाजार सावरण्यास सुरुवात झाली. शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 257 अंकांची वाढ झाली तर निफ्टीमध्ये (Nifty) 86 अंकांची वाढ झाली होती. सेन्सेक्समध्ये 0.44 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,031 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.50 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,577 अंकांवर स्थिरावला.
मंगळवारी निफ्टी बँक इंडेक्समध्ये 399 अंकांची वाढ झाली असून तो 38,697 वर पोहोचला आहे. 2077 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1235 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 146 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.