Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही नफावसुलीचे संकेत, सेन्सेक्समध्ये घसरण
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव दिसत आहे. जागतिक शेअर बाजारात पडझड दिसून येत आहे.
Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात आज व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर नफावसुलीचे संकेत दिसून येत आहेत. जागतिक शेअर बाजारात घसरण दिसत असून भारतीय शेअर बाजारावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारातील (Indian Share Market) व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दर वाढवण्याचे संकेत दिल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात घसरण दिसून आली. आशियाई शेअर बाजारातही (Asian Share Market) विक्रीचा दबाब दिसून येत आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 439 अंकाच्या घसरणीसह 62,395.55 खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 100.40 अंकांच्या घसरणीसह 18,600.65 खुला झाला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 329.34 अंकांच्या घसरणीसह 62,505.26 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 94 अंकांच्या घसरणीसह 18,606.15 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 9 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 23 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 13 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 37 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे.
सेन्सेक्स निर्देशांकातील बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स, आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत आहे. तर, मारुती, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, कोटक बँक, एशियन पेंट्स, टायटन, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, विप्रो, पॉवरग्रीड आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
निफ्टी निर्देशांकात बजाज फायनान्स, अदानी एंटरप्रायझेस, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, एसबीआय लाइफ आदी कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. तर, एचसीएल टेक, टाटा स्टील, हिंदाल्को, ओएनजीसीच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
सोमवारी बाजारात अस्थिरता
सेन्सेक्समध्ये सोमवारी 0.05 टक्क्यांची घसरण होऊन तो 62,834 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 0.03 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,701 अंकांवर स्थिरावला. निफ्टी बँकमध्ये 229 अंकांची वाढ होऊन तो 43,332 अंकावर स्थिरावला. शेअर बाजार बंद होताना एकूण 2080 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1401 शेअर्समध्ये घसरण झाली. एकूण 191 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या: