एक्स्प्लोर

Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी

Ajit Pawar and Naresh Arora: डिझाईन बॉक्स या कंपनीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची रणनीती ठरवली जायची. नरेश अरोरा या कंपनीचे प्रमुख होते. त्यांनी अजितदादांना गुलाबी जॅकेट घालण्याचा सल्ला दिला

Ajit Pawar and Naresh Arora: अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर नरेश अरोरा हे कुठे गेले आहेत? ते व्हीएसआर कंपनीबाबत काहीच का बोलत नाहीत? अजितदादांच्या निधनानंतर फक्त एक-दोन दिवस नरेश अरोरा (Naresh Arora) दिसले. त्यानंतर ते गायब झाले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नरेश अरोरा अजितदादांच्या अभिनंदनासाठी आले होते, तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढला होता. मी तेव्हा त्यांना म्हटलं होतं की, तुम्ही सोल्जर नाही तर तुम्ही सॅलरी सोल्जर (पगारी सैनिक) आहात, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. (Ajit Pawar Plane crash)

नरेश अरोरा हे अजित पवार यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत होते.अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर व्हीएसआर कंपनीबाबत नरेश अरोरा काहीच बोलत नाहीत. डीजीसीएच्या अहवालानंतर त्यावर काही कंटेट देण्याची जबाबदारी नरेश अरोरा यांची होती. पण ते आता कुठे आहेत? 'बहेती हवा सा था वो, कहा गया उसे ढुंढो', असे त्यांच्याबाबत बोलण्याची वेळ आली आहे.  नरेश अरोरा हे अजितदादांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळायचे. त्यांनीच अजितदादांना गुलाबी जॅकेट दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या स्ट्रॅटेजी तेच ठरवत होते. विधानसभा  निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी अजितदादांना पुष्पगुच्छ देताना खांद्यावर हात टाकला होता. पण आता अरोरा कुठे गेले आहेत, असा प्रश्न मला पडला. त्यामुळे मी ट्विट केल्याचे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले. 

नरेश अरोरा देशात आहेत की देशाबाहेर आहेत, हे माहिती नाही. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर ते कुठेच दिसले नाहीत? खरंतर या दु:खाच्या काळात त्यांनी आमच्यासोबत राहायला हवे होते. त्यांनी अजितदादांच्या अपघातप्रकरणावर काहीतरी बोलायला हवे होते. आतादेखील त्यांचं कॉन्ट्रॅक्ट सुरुच असेल ना? मी असं बोलल्यावर आपल्या पक्षाचा आमदार असं कसं बोलतोय, असा प्रश्न ते इतर नेत्यांना विचारतील. ते थोडेसे नाराज होतील. पण त्यांचा मला कधी फोन येत नाही, मी त्यांना कधी फोन करत नाही. सभागृहात अजून अजितदादांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर चर्चा झालेली नाही. या आठवड्यात दोन दिवस झाल्यानंतर पुढील आठवड्यात अधिवेशनात सुट्ट्या आहेत. त्यानंतर अधिवेशन संपेल. रोहित पवार त्यांच्या पद्धतीने या मुद्द्यावर चर्चा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.

आणखी वाचा

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Embed widget