Share Market Closing Bell : शेअर बाजारात उसळण, सेन्सेक्स-निफ्टी दोन टक्क्यांनी वधारला
Share Market Updates : शेअर बाजारात आज दिवसभर तेजीचे वातावरण राहिले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन टक्क्यांनी वधारला.
Share Market Updates : शेअर बाजारात आज दिवसभर तेजी राहिली. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स, निफ्टीत तेजी दिसून आली होती. बाजार बंद होताना ही तेजी कायम राहिली. सेन्सेक्स आणि निफ्टीत दोन टक्क्यांची वाढ दिसून आली. सेन्सेक्सने आज 60 हजार अंकाचा टप्पा ओलांडला. तर, निफ्टीने 18 हजारांचा टप्पा ओलांडला.
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाच्या बातमीने या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 1,335.05 अंकांनी म्हणजे 2.25 टक्क्यांनी वधारला. सेन्सेक्स 60,611.74 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टीत 382.90 अंकांनी म्हणजे जवळपास 2.17 टक्क्यांनी वधारला. निफ्टी आज 18,053.40 अंकांवर बंद झाला.
निफ्टी बॅंक निर्देशांक देखील तेजीत, १ हजार ४८७ अंकांनी वधारुन निर्देशांक ३८ हजार ६३५ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीचा शेअर चार टक्क्यांनी वधारला. निफ्टीने 18 जानेवारीनंतर पुन्हा एकदा 18 हजार अंकांचा टप्पा ओलांडला.
एचडीएफसी बँक, एचडीएफसी, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी लाइफ आणि कोटक महिंद्रा बँकचे शेअर्स वधारले. इन्फोसिस, टायटन कंपनी आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सच्या शेअरमध्ये घसरण झाली. बँक, मेटल, पॉवर आदी क्षेत्रातील स्टॉकमध्ये 2-3 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये एक टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
शेअर बाजाराची दमदार सुरुवात
शेअर बाजार सुरू होताच काही सेन्सेक्सने 59900 अंकाचा टप्पा ओलांडला होता. तर, निफ्टी 17900 अंकापर्यंत आला होता. जागतिक बाजारपेठांमध्ये पुन्हा
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- HDFC च्या शेअर दरात मोठी उसळण, कंपनीच्या 'या' निर्णयाने शेअर वधारले
- Vodaphone-Idea : व्होडाफोनने VI मध्ये वाढवली हिस्सेदारी! जाणून घ्या कंपनीचा प्लॅन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha