एक्स्प्लोर

Share Market News: काल दिवाळी, आज दिवाळं; शेअर बाजारातील घसरणीने गुंतवणूकदारांना फटका

Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज झालेल्या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.

Share Market News: सोमवारी शेअर बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला होता. आज, मात्र शेअर बाजारात आज विक्रीचा सपाटा दिसून आला. आज शेअर बाजारात मोठी घसरण (Share Market Fall) दिसून आली. काल दिवाळी साजरी केलेल्या गुंतवणूकदारांचे आज दिवाळं निघालं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 631.83 अंकांनी घसरून 60,115.48 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 187.05 अंकांच्या घसरणीसह 17,914.15 अंकांवर स्थिरावला. 

आज शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. शेअर बाजारातील व्यवहार किंचींत तेजीसह सुरू झाले. त्यानंतर बाजारात नफा वसुलीचा दबाव वाढू लागला होता. सेन्सेक्समध्ये झालेल्या घसरणीमुळे निर्देशांक 60,000 अंकांखाली घसरला होता. तर, निफ्टी निर्देशांकाने आज दिवसभरात 17,856 अंकांची निच्चांकी पातळी गाठली होती. त्यानंतर काही प्रमाणात बाजार सावरला. सेन्सेक्स 60,115.48 अंकांवर आणि निफ्टी 17,914.15  अंकांवर बंद झाला. आज बाजारात व्यवहार झालेल्या कंपन्यांपैकी 1376  कंपन्यांचे शेअर वधारले होते. तर, 2027 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. 152 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. 

या शेअर्समध्ये दिसली तेजी

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 8 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते. तर, 22 कंपन्यांचे शेअर दर घसरले. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 17 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 33 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली. निफ्टीत टाटा मोटर्सच्या शेअर दरात 5.92 टक्क्यांनी वाढ झाली. त्याशिवाय, अपोलो हॉस्पिटल, हिंदाल्को, पॉवरग्रीड, डिव्हिज लॅब आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात 5.67 टक्क्यांची घसरण दिसून आली. भारती एअरटेल, आयशर मोटर्स, अदानी पोर्टस, स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली. 

इंडेक्‍स किती अंकांवर बंद आजचा उच्चांक आजचा नीचांक किती टक्क्यांनी बदल
BSE Sensex 60,115.48 60,809.65 59,938.38 -1.04%
BSE SmallCap 28,794.89 28,976.17 28,712.58 -0.46%
India VIX 15.51 15.935 14.5625 0.0585
NIFTY Midcap 100 31,559.30 31,771.00 31,383.70 -0.50%
NIFTY Smallcap 100 9,652.25 9,734.45 9,621.75 -0.59%
NIfty smallcap 50 4,321.60 4,351.05 4,310.90 -0.47%
Nifty 100 18,081.00 18,274.40 18,008.30 -0.92%
Nifty 200 9,475.35 9,571.45 9,435.50 -0.86%
Nifty 50 17,914.15 18,127.60 17,856.00

-1.03%

घसरणीने गुंतवणूकदारांना फटका

बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 280.84 लाख कोटी रुपयांवर आले. सोमवारी 282.92 लाख कोटी रुपये होते. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Clarification :  निवडणुकीच्या धामधुमीत पुस्तक बॉम्बMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Embed widget