(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Closing Bell: शेअर बाजारात नफावसुली जोर, सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात घसरण
Share Market Closing Bell: नफावसुलीने शेअर बाजारात घसरण झाली. आज शेअर बाजारात दिवसभर अस्थिरता दिसून आली.
Share Market Closing Bell: आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अतिशय निराशाजनक राहिला. जागतिक शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे बाजारात नफावसुली दिसून आली. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 390 अंकांची घसरण दिसून आली. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 109 अंकांची घसरण दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स 57,235 अंकांवर स्थिरावला तर, निफ्टी 17,014 अंकांवर बंद झाला.
बाजारात आज झालेल्या व्यवहारात एकूण 3562 कंपन्यांपैकी 1309 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 2119 शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली. 134 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. आज दिवसभरातील व्यवहारात 200 कंपन्यांच्या शेअर दराने अप्पर सर्किट गाठला. तर, 180 कंपन्यांचे शेअर दर लोअर सर्किटसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात दोन लाख कोटींची घट झाली. मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल 269.90 लाख कोटी होते.
आज, शेअर बाजारात फार्मा सेक्टरमधील शेअर दरात खरेदीचा जोर दिसून आला. मेटल्स आणि मीडिया सेक्टरमधील शेअर दरात खरेदी दिसून आली. तर, बँकिंग, ऑटो, आयटी, एफएमसीजी, एनर्जी सेक्टरमधील शेअर दरात विक्रीचा सपाटा दिसून आला. स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्समध्ये ही मोठी घसरण दिसून आली. निफ्टी 50 पैकी 16 शेअर दरात तेजी दिसून आली. तर, उर्वरीत 34 शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 8 शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 22 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली.
एचसीएल टेक, सन फार्मा, डॉ. रेड्डी लॅब, रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, विप्रो, एसबीआय, लार्सन, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 13 अंकांच्या घसरणीसह 57,512.74 अंकावर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 36 अंकांच्या घसरणीसह 57,512.74 अंकांवर खुला झाला होता. आज शेअर बाजारातील व्यवहारांमध्य सुरुवातीच्या टप्प्यात ऑटो, फार्मा, मेटल्स, एफएमसीजी, एनर्जीच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, आयटी, बँकिंग, रिअल इस्टेट, आदी क्षेत्रात घसरण दिसून आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: