ऐन दिवाळीत महागाई आणखी वाढण्याची शक्यता; सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 7.41 टक्के
Inflation : सप्टेंबर महिन्यात महागाई दर 7.41 टक्क्यांवर गेला असून खाद्य पदार्थांचा महागाई दर 7.62 टक्क्यांवरून 8.60 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबई: ऐन दिवाळीच्या काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण सप्टेंबर महिन्यात महागाई दरात वाढ पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये ग्राहकमूल्य निर्देशांक (CPI)7.41% वर गेल्याने महागाई पाच महिन्यांच्या उच्चांवर पोहोचली आहे.
ऑगस्ट महिन्यातील 7 टक्क्यांवरील महागाई दर होता तोच आता सप्टेंबर महिन्यात 7.41 टक्क्यांवर गेला आणि यासोबतच खाद्य पदार्थांचा महागाई दर 7.62 टक्क्यांवरून 8.60 टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी आणि ग्रामीण महागाई दरातही वृद्धी झाली आहे. अनियमित पाऊस, पुरवठ्यातील धक्का यामुळे किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये 7.41 टक्क्यांच्या 5 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
महागाई वाढीची प्रमुख कारणं
भारताची किरकोळ चलनवाढ, अन्नधान्याच्या चढ्या किमती, अनियमित पाऊस आणि रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पुरवठा साखळीला बसलेले धक्के या सगळ्याचा परिणाम असल्याचं बोललं जातंय. सर्वात मोठी श्रेणी असलेल्या अन्नधान्य आणि भाजीपाला यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती गेल्या दोन वर्षांत वाढल्या आहेत. तर दुसरीकडे अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (IIP) नुसार कारखाना उत्पादन ऑगस्टमध्ये (-) 0.8 टक्क्यांनी संकुचित झाले.
कुठल्या गोष्टी महाग होणार?
अपेक्षेप्रमाणे सप्टेंबरमध्ये महागाई वाढल्याने अन्नधान्याच्या किमती वाढल्या होत्या, अन्नधान्य महागाई ऑगस्टमधील 7.62 टक्क्यांवरून 8.6 टक्क्यांवर पोहोचली होती. अन्नधान्य चलनवाढीचा आकडा 23 महिन्यांतील सर्वाधिक आहे. आता या महागाई दरवाढीमुळे कुठल्य़ा गोष्टींमध्ये बजेट कोलमडणार आहे पाहुया..
सप्टेंबर 2022 महागाई बदल..
अन्नामध्ये, भाजीपाल्याचा निर्देशांक महिन्या-दर-महिन्याने 2.6 टक्क्यांनी वाढला. तृणधान्ये आणि कडधान्यांमध्येही मजबूत वाढ दिसून आली आहे, त्यांच्या निर्देशांकात महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर अनुक्रमे 2.0 टक्के आणि 1.1 टक्के वाढ झाली.
औद्योगिक उत्पादनात घट
देशाच्या औद्योगिक उत्पादनातही घट होत आहे. औद्योगिक उत्पादन वाढ ऑगस्टमध्ये 0.80 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, जी जुलैमध्ये 2.4 टक्के आणि एक वर्षापूर्वी ऑगस्टमध्ये 13 टक्के होती. या वर्षी मे आणि जूनमध्ये औद्योगिक उत्पादनाचा वाढीचा दर दुहेरी आकड्यांमध्ये असला तरी त्यानंतर सातत्याने घसरण होत आहे.
कोणत्या क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले आहे?
जर आकडेवारीवर नजर टाकली तर, ऑगस्टमध्ये सर्वात मोठी घसरण उत्पादन क्षेत्रात दिसून आली, जिथे शून्य ते 0.7 टक्के विकास दर आहे. याशिवाय खाण क्षेत्राचा उत्पादन दरही शून्याच्या खाली 3.9 टक्क्यांनी घसरला आहे, तर ऊर्जा क्षेत्राने 1.4 टक्के वाढ केली आहे. यापूर्वी एप्रिल २०२० मध्ये कोरोनाच्या काळात औद्योगिक उत्पादनात 57.3 टक्क्यांची मोठी घट झाली होती.
आरबीआयचा दावा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) त्यांच्या किंमत आदेशाची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरली आहे, सप्टेंबरमधील नवीनतम ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) महागाईने सलग तिसऱ्या तिमाहीची पुष्टी केली आहे ज्यामध्ये सरासरी महागाई 2-6 टक्के इतकी परिस्थितीच्या बाहेर राहिली आहे. सीपीआय चलनवाढीचा दर जानेवारी-मार्चमध्ये सरासरी 6.3 टक्के, एप्रिल-जूनमध्ये 7.3 टक्के आणि आता जुलै-सप्टेंबरमध्ये ७ टक्के आहे.
आजच्या महागाईच्या मुद्रेचा अर्थ चलनवाढीने आता सलग ३६ महिने किंवा तीन वर्षे पूर्ण RBI च्या मध्यम मुदतीच्या 4 टक्के लक्ष्यापेक्षा जास्त खर्च केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, चलनवाढ ही सलग तीन तिमाहीत अनिवार्यपणे 2 ते 6 टक्के अशी श्रेणीच्या बाहेर आहे. ज्याला चलनवाढ रोखण्यात अपयश आलं ्असं म्हणता येईल असा तज्त्रांनी सांगितलं आहे
आरबीआय अपयशाचा अहवाल देणार?
कायद्यानुसार, आरबीआयने आता केंद्र सरकारला एक अहवाल सादर करणे आवश्यक आहे की ते का अयशस्वी झाले, त्यांनी सुचविलेल्या उपाययोजना आणि कोणत्या कालावधीत महागाई लक्ष्यावर परत येईल असा हा अहवाल असणार आहे.