एक्स्प्लोर

Share Market Closing Bell : शेअर बाजारात बँकिंग शेअर्समध्ये खरेदीचा जोर; गुंतवणूकादारांनी 67 हजार कोटी कमावले

Stock Market Closing Bell : सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदीदारांचा उत्साह दिसून आला.

मुंबई :  भारतीय शेअर बाजारासाठी आज बुधवारचा दिवस चांगलाच ठरला. बँकिंग स्टॉक्समध्ये (Banking Stocks) खरेदीचा जोर दिसल्याने  बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले. तर, दुसरीकडे मिड कॅप स्टॉक्सने (Mid Cap Stocks) पुन्हा एकदा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. आज दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 213 अंकांनी वधारत 65,433 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 47 अंकांच्या तेजीसह 19,444 अंकावर स्थिरावला. मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या (JFS) शेअर दराला आजही लोअर सर्किट लागले. सलग तीन दिवसांपासून JFS च्या शेअर दराला लोअर सर्किट लागत आहे.  JFS चा शेअर दर 224.65 रुपयांवर बंद झाला. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?

आज दिवसभरातील व्यवहारात बँकिंग सेक्टरमध्ये चांगलीच तेजी दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांक 485 अंकांच्या तेजीसह 44,479  अंकांवर स्थिरावला. बँकिंग शिवाय, आयटी, मीडिया, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर सेक्टरमधील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जीच्या स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आजही गुंतवणूकदारांकडून खरेदीचा उत्साह दिसून आला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 20 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 31 कंपन्यांचे शेअर दर वधारले. 

आजच्या व्यवहारात अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात 2.24 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 1.61 टक्के, एसबीआयमध्ये 1.44 टक्के, लार्सनमध्ये 1.35 टक्के, टाटा स्टीलमध्ये 1.23 टक्के, कोटक महिंद्रामध्ये 0.99 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, सन फार्मामध्ये 1.10 टक्क्यांची घसरण दिसून आली. भारती एअरटेल 1.01 टक्के, टाटा मोटर्स 0.94 टक्के, टेक महिंद्रा 0.84 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

इंडेक्‍स किती अंकांवर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 65,433.30 65,504.71 65,108.51 00:04:45
BSE SmallCap 36,065.95 36,167.46 35,912.73 0.60%
India VIX 11.73 11.89 10.31 -0.17%
NIFTY Midcap 100 38,694.65 38,831.80 38,641.70 0.39%
NIFTY Smallcap 100 11,960.20 11,981.25 11,885.35 0.91%
NIfty smallcap 50 5,455.30 5,464.50 5,395.45 1.44%
Nifty 100 19,362.55 19,397.00 19,302.70 0.19%
Nifty 200 10,340.05 10,360.40 10,313.60 0.22%
Nifty 50 19,444.00 19,472.05 19,366.60 0.25%

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ 

मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 23 ऑगस्ट रोजी 309.03 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.  मंगळवारी, हे बाजार भांडवल 308.36 लाख कोटी रुपयांच्या घरात  होते. मुंबई शेअर बाजाराचे मार्केट कॅप आज सुमारे 67 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे.

2080 कंपन्यांचे शेअर्स वधारले 

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी बहुतांशी कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या 3,783 कंपन्यांच्या शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 2,080  कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. त्याच वेळी, 1,541 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली आहे. तर 165 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 262 कंपन्यांच्या शेअर दरांनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 30 कंपन्यांच्या शेअर्सने त्यांचा 52 आठवड्यांचा नीचांक दर गाठला. आजच्या व्यवहारात 11 कंपन्यांच्या शेअर दराला अप्पर सर्किट लागले. तर, 6 कंपन्यांच्या शेअर दराला लोअर सर्किट लागले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaCyber Police Nagpur : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजरMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
Embed widget