Share Market : शेअर बाजारात मंदी, सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, निफ्टी घसरून 16,300 अंकांवर
BSE Update : शेअर बाजारात पहिल्या सत्रात घसरण झाली आहे. शुक्रवारी बाजार उघडताच सेन्सेक्ससह निफ्टीचीही घसरण झालेली पाहायला मिळाली.
BSE Update : शेअर बाजारात (Share Market) पहिल्या सत्रात घसरण झाली आहे. शुक्रवारी बाजार उघडताच सेन्सेक्ससह (Sensex) निफ्टीचीही (Nifty 50) घसरण झालेली पाहायला मिळाली. सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला तर निफ्टी घसरून 16,300 अंकांवर पोहोचला. पहिल्या सत्रात आयटी कंपन्यांसह धातू आणि बँकांचे शेअर घसरले. सध्या सेन्सेक्स 684.24 म्हणजेच 1.24 टक्क्यांनी घसरून 54,636 वर आहे. तर निफ्टी 190.05 ने म्हणजेच 1.15 टक्क्यांनी घसरून 16,288 अंकावर आहे. ऑटो सेक्टरला आज लाभ झाला आहे.
शेअर बाजाराच्या पहिल्याच सत्रात सेन्सेक्सवर विप्रो (Wipro), बजाज फायनान्स (Bajaj Finance), टाटा स्टील (Tata Steel), महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), एचडीएफसी HDFC, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस (Infosys) आणि बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) सकाळच्या सौद्यांमध्ये आघाडीवर होते. याउलट, टायटन कंपनी, एशियन पेंट्स आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हिरव्या रंगात व्यवहार करत होते.
विप्रो, बजाजच्या शेअरमध्ये मोठी घसरण
Wipro, Hindalco आणि Bajaj Finance च्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. विप्रोचे शेअर 3.39 टक्क्यांनी घसरून 458.95 वर पोहोचले आहेत. याउलट एशियन पेंट्सचे शेअर चांगलेच वधारले आहेत. एशियन पेंट्सचे शेअर सुमारे 30 रुपयांनी वाढून 2,717 वर पोहोचले आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला
आज जागतिक बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे. डॉलर आणि कच्च्या तेलांच्या किंमतीमुळे रुपया आज विक्रमी पातळीवर घसरला आहे. आज सुरुवातीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया 8 पैशांवी घसरला आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Titan - 0.67 टक्के
- Asian Paint - 0.40 टक्के
- Reliance- 2.74 टक्के
- Powergrid - 0.16 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Maruti - 0.17 टक्के
- Bharti Airtel - 0.23 टक्के
- Axis Bank - 0.37 टक्के
- ITC - 0.50 टक्के