एक्स्प्लोर

EPFO अन् ESIC सदस्यांना ATM मधून पीएफचे पैसे कधीपासून काढता येणार? नवी अपडेट समोर 

EPFO : कर्मचारी भविष्य निधी संघटना आणि कर्मचारी राज्य विमा निगमच्या सदस्यांना लवकरच त्यांच्या क्लेमची रक्कम ई-वॉलेट्सच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना आणि कर्मचारी राज्य विमा निगमच्या  सदस्यांना त्यांच्या क्लेमची रक्कम सहजपणे मिळावी यासाठी नवी सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. ईपीएफओमधील पीएफची रक्कम एटीम कार्डद्वारे काढण्यासंदर्भात विचार केला जात आहे. एटीएम आणि ई-वॉलेट ची प्रक्रिया  मार्च 2025 पर्यंत लागू केली जाईल, अशी माहिती आहे. 

सुमिता डावरा यांच्या माहितीनुसार ईपीएफओ पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची प्रक्रिया सोपी करण्याबाबत विचार करत आहे. ऑटो सेटलमेंट प्रकरणात रक्कम खातेदाराच्या बँक खात्यात जाईल, यानंतर कर्मचारी एटीम कार्डवरुन देखील रक्कम काढ शकतो. याशिवाय ईपीएफओकडून असा प्रयत्न केला जात आहे की क्लेमची रक्कम ई-वॉलेटमध्ये देखील पाठवता येईल. या सुविधांची अंमबजावणी करण्यासंदर्भात नवी व्यवस्था देखील तयार केली जात आहे. 

सुमिता  डावरा यांनी यासंदर्भात म्हटलं की नवी व्यवस्था लागू करण्यासाठी बँक आणि इतर वित्तीय संस्थांसोबत चर्चा सुरु केली आहे. लवकरच एक व्यावहारिक योजना लागू करण्यात येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत देखील या संदर्भात संपर्क सुरु  असल्याचं म्हटलं. ईपीएफओशी संबंधित एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार ही प्रक्रिया केवळ रक्कम काढण्यासंदर्भात सोपी करण्यात येत आहे. पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासंदर्भातील नियम बदलले जाणार नाहीत. सध्या लागू असलेल्या नियमानुसार कर्मचारी एका वेळी जितकी  रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे ती सुरु राहील. 

ईपीएफओ पेन्शनच्या उच्च वेतन पर्यायांची चौकशी आणि वेतन विवरण अपलोड करण्याची तारीख 31 जानेवारीपर्यंत वाढण्यात आली आहे. ईपीएफओच्या माहितानुसार 3.1 लाख अर्जदारांना मुदतवाढीचा फायदा होणार आहे. 

देशभरात सध्या पीएफ खातेदारांची संख्या 2023 च्या तुलनेत वाढली आहे. ईपीएफओमध्ये जवळपास 7 कोटी 47 लाख खातेदार 2024 मध्ये योगदान देत आहेत. या खातेदारांकडून त्यांच्या मूळ वेतनाच्या 12.5 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. तर, कंपनीकडून देखील 12.5 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. त्यापैकी काही रक्कम पीएफमध्ये तर काही रक्कम पेन्शन खात्यात जमा केली जाते. 

पीएफ खातेदारांना दरवर्षी व्याज दिलं जातं. पीएफ खातेदारांना साधारणपणे 8 ते 8.50 टक्क्यांच्या दरम्यान व्याज मिळतंय. आगामी वर्षांमध्ये अधिक व्याज देण्यासाठी ईपीएफओकडून इटीएफमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.  सध्या इटीएफमध्ये ईपीएफओकडून 10 टक्के रक्कम  गुंतवली जाते.

इतर बातम्या :    

EPFO आणि ESIC ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता ई-वॉलेट सुविधेद्वारे पैसे थेट तुमच्या खात्यात येणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अकोला पश्चिमच्या काँग्रेस आमदाराच्या अडचणी वाढणार? दाऊद, हसीना पारकरशी संबंध असल्याच्या महिलेच्या दाव्यावरुन तक्रार दाखल
दाऊद, हसीना पारकरशी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे संबंध? पोलिसांत तक्रार दाखल
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  19 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 डिसेंबर 2024 : ABP MajhaGateway of India Mumbai : मुंबई- एलिफंटाकडे निघालेली प्रवासी बोट बुडाली, मृतांचा आकडा 13वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अकोला पश्चिमच्या काँग्रेस आमदाराच्या अडचणी वाढणार? दाऊद, हसीना पारकरशी संबंध असल्याच्या महिलेच्या दाव्यावरुन तक्रार दाखल
दाऊद, हसीना पारकरशी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे संबंध? पोलिसांत तक्रार दाखल
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident: लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं, बोटीच्या फळीला पकडून तरंगत राहिला; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Embed widget