शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 1 जानेवारीपासून कोणत्याही तारणशिवाय मिळणार 2 लाखांचं कर्ज
शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) तारणमुक्त कर्जाची रक्कम 2 लाख रुपये केली आहे. वाढीचा हा निर्णय 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.
Reserve Bank of India : शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) तारणमुक्त कर्जाची रक्कम 2 लाख रुपये केली आहे. वाढीचा हा निर्णय 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. विशेष बाब म्हणजे या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणतही तारण न ठेवता 2 लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे. यापूर्वी 1.60 लाख रुपयांचे कर्ज मिळत होते. या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येतही वाढ होणार आहे. दरम्यान, याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी बँकांना मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने शेतकऱ्यांसाठी कोणतेही तारण न घेता कर्ज मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये केली आहे, जी 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार
भारतीय रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्जाचा सहज प्रवेश सुलभ होणार आहे. सरकारच्या सुधारित व्याज सवलत योजनेला पूरक ठरेल, जी 4 टक्के प्रभावी व्याज दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. या उपक्रमाकडे कृषी क्षेत्रातील आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे. ज्यामुळं शेतकऱ्यांना कृषी कार्यात गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्या अनेक खाजगी क्षेत्रातील बँका कर्जावर 8 टक्के ते 12 टक्के व्याजदर आकारत आहेत. RBI च्या या निर्णयामुळं बँकांच्या जाळ्यात अडकण्यापासून शेतकरी वाचतील.
नवीन वर्षात RBI घेणार मोठा निर्णय
नवीन वर्षात कर्जदारांना आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. कारण नवीन वर्षात व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. RBI ने सलग अकराव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही. तज्ज्ञांच्या मते व्याजदर कपातीचा निर्णय 2025 च्या सुरुवातीला होण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून महागाईचा दर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, नवीन वर्षात महागाईचा दर कमी होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय. त्यामुळं महागाईचा दर कमी आल्यास व्याजदरात देखील कपात होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
महत्वाच्या बातम्या: