(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुमच्या पैशांच्या सुरक्षेची हमी, RBI चा 'हा' बाँड उत्तम पर्याय; पैसे कसे गुंतवाल?
किरकोळ गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेच्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्समध्ये प्रचंड व्याज मिळतं. कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो.
Reserve Bank of India Floting Rate Saving Bonds: जर तुम्हाला तुमची सेविंग्सची एखाद्या सुरक्षित आणि बक्कळ व्याज देणाऱ्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, तर RBI चा फ्लोटिंग रेट सेविंग बॉन्ड तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. इथे तुम्हाला कोणत्याबी बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळतील. आरबीआयच्या फ्लोटिंग रेट सेविंग बॉन्डचं व्याज 8.05 टक्के आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी काही फिचर्सबाबात सविस्तर जाणून घेऊयात...
RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड भारत सरकारनं जारी केले आहेत. आरबीआयचे हे बॉन्ड सात वर्षांच्या मॅच्युरिटी टाईमसोबत येतात. हे नॉन-ट्रेडेड बाँड आहेत, ज्या अंतर्गत गॅरेन्टेड व्याज मिळतं, पण किती मिळेल याबाबत काहीच सांगू शकत नाही. हे बॉन्ड केंद्र सरकारनं देऊ केलेली एक लहान बचत योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) च्या व्याज दराशी जोडलेले आहेत.
या बाँड अंतर्गत व्याज कसं ठरवलं जातं?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या बॉन्डवर दिल्या जाणाऱ्या व्याज दरात बदल होत राहतात. महत्त्वाची बाब म्हणजे, या बॉन्डमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित आहे. या बाँडचं व्याज अल्पबचत योजनेच्या व्याजाच्या त्रैमासिक पुनरावलोकनाच्या आधारावर ठरवलं जातं. तर या बाँड अंतर्गत NSC पेक्षा 0.35 टक्के जास्त व्याज दिलं जातं. अल्पबचत योजनेवरील व्याज वाढल्यास बॉन्डचा रिटर्नही वाढेल आणि अल्पबचत योजनेवरील व्याज कमी झाल्यास त्याचा परतावाही कमी होईल. बाँडवरील व्याजदर सहा महिन्यांनी बदलतं.
RBI च्या बॉन्डमध्ये कोण गुंतवणूक करु शकतं?
कोणताही भारतीय नागरिक RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्स 2020 (करपात्र) मध्ये गुंतवणूक करू शकतो. अनिवासी भारतीयांसाठी ही बाँड योजना नाही. तुम्ही किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकता, तसेच या बाँडमध्ये गुंतवणुकीसाठी कोणताही कमाल मर्यादा नाही.
RBI रिटेल डायरेक्ट अंतर्गत बाँडमध्ये गुंतवणूक कशी कराल?
गुंतवणूक करण्यासाठी, गुंतवणूकदारांना प्रथम RBI च्या रिटेल डायरेक्ट पोर्टलद्वारे बाँड लेज अकाउंट (BLA) उघडावं लागेल. ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी केलं जाईल आणि गुंतवणूकदाराच्या बाँड लेजर खात्यात जमा केलं जाईल. तुम्ही या बाँडमध्ये नॉमिनी जोडू शकता. तुम्ही यूपीआय, नेट बँकिंग आणि इतर माध्यमातून बाँडमध्ये पेमेंटही करू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :