RBI Office Attendant : रिझर्व्ह बँकेकडून 4 बँकांवर निर्बंध; लातूरच्या 'या' बँकेचाही समावेश, पैसे काढण्यावरही मर्यादा
RBI Office Attendant : रिझर्व्ह बँकेकडून 4 बँकांवर निर्बंध लादण्यात आले असून यामध्ये लातूरच्या साईबाबा जनता सहकारी बँकेचाही समावेश आहे.
RBI Rules : रिझर्व्ह बँकेनं (RBI) चार बँकांवर बंदी घातली असून या बँकांच्या व्यवहारांवरही निर्बंध लादले आहेत. यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. या चार बँकांशी संबंधित ग्राहक आता फक्त आरबीआयनं निश्चित केलेल्या मर्यादेतूनच पैसे काढू शकतात. आरबीआयनं साईबाबा जनता सहकारी बँक (Saibaba Janata Sahakari Bank Ltd.) , द सूरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सुरी (पश्चिम बंगाल) (The Suri Friends' Union Co Operative Bank) आणि नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., बहराइचवर (National Urban Cooperative Bank) निर्बंध लादले आहेत. या बँकांची ढासळती आर्थिक स्थिती पाहता आरबीआयनं हे पाऊल उचललं आहे.
पैसे काढण्यावर निर्बंध
साईबाबा जनता सहकारी बँकेचे ठेवीदार 20,000 रुपयांपेक्षा जास्त काढू शकत नाहीत. सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी, ही मर्यादा 50,000 रुपये आहे, तर नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी, पैसे काढण्याची मर्यादा प्रति ग्राहक 10,000 रुपये करण्यात आली आहे.
6 महिन्यांपर्यंत लागू असणार नियम
RBI नं बिजनौर-आधारित युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरही निर्बंध लादले आहेत. तसेच ग्राहकांनाही या बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध असणार आहेत. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 अंतर्गत मध्यवर्ती बँकेनं 4 सहकारी बँकांना या सूचना दिल्या आहेत. आरबीआयकडून लादण्यात आलेले हे निर्बंध तब्बल सहा महिन्यांपर्यंत लागू असणार आहेत. आरबीआयनं सांगितलं की, फसवणुकीशी संबंधित काही नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेला 57.75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, दुसर्या निवेदनात, रिझर्व्ह बँकेनं सांगितले की, त्यांनी फसवणुकी संबंधित काही नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेला 57.75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :