(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RIL Quarterly Results : रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचा तिमाही निकाल आला, नफ्यात मोठी वाढ!
रिलायन्स इंडस्ट्रजि लिमिटेड या कंपनीने जानेवारी-मार्च या तिमाहीचे आपले निकाल जारी केली आहेत. या कंपनीने चांगला नफा मिळवला आहे.
मुंबई : अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड (RIL) या उद्योगसमूहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी जमाईच्या बाबतीत जोरदार मुसंडी मारली आहे. एक लाख कोटी रुपयांचा अॅन्यूअल प्री-टॅक्स प्रॉफिट नोंदवणारी ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. या कंपनीचा नफा 7 टक्के वाढून 79,020 कोटी रुपये झाला आहे. 31 मार्च रोजी संपलेल्या 2023-2-24 या आर्थिक वर्षात EBITDA 16.1 टक्के वाढून 1.79 लाख कोटी रुपये झाला आहे.
तिमाहीचा निकाल काय?
RIL ने सांगितल्यानुसार 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान, कंपनीचा निव्वळ नफा 21,243 कोटी रुपये झाला आहे. ऑटूल-टू-केमिकल (O2C) क्षेत्रात झालेल्या सुधारणांमुळे हा फायदा झला आहे. कंपनीने जारी केलेल्या प्रेसनोटनुसार कंपनीच्या मालकांना 18,951 कोटी रुपये नफा झाला आहे.
रिलायन्स जिओची भरारी
रिलायंस जिओने (Reliance Jio) संपलेल्या तिमाहीत 12 टक्क्यांपेक्षा जास्त नफा नोंदवला आहे. हा नफा 5,583 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. संपलेल्या तिमाहीत Jio वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच हा फायदा झाला आहे. जिओच्या प्रति ग्राहक सरासरी कमाई (ARPU) ही 1.6 टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत जिओला 1.09 कोटी नवे ग्राहक मिळाले आहेत.
रिलायन्स रिटेलमध्येही नफा वाढला
रिलायन्स रिटेलच्याही नफ्यात सरलेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. हा नफा या वर्षी 18.1 टक्क्यांनी वाढून 5,632 कोटी रुपये झाला आहे. रिलायन्स रिटेलच्या एकूण व्यापारातही 10.6 टक्क्यांनी नफा झाला असून तो 76,627 कोटींवर पोहोचला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशनशी संबंधित सामानांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे हा नफा नोंदवला गेला आहे. सरलेल्या तिमाहीत या कंपनीने अनेक नवे स्टोअर्स चालू केले आहेत. आता रिलायन्स रिटेलचे देशभरात 18,836 हजार स्टोअर्स झाले आहेत.
तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातही मोठा नफा
रिलायन्स इंडस्ट्रिजने तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातही चांगला नफा मिळवला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या क्षेत्रात कंपनीला 42 टक्के नफआ मिळाला असूनतो 6,468 कोटी रुपये झाली आहे.
हेही वाचा :
अंबानी, टाटा ते शाहरुख खान, देशातली पाच आलिशान घरं, ज्यांची किंमत वाचून धक्क व्हाल!
HDFC, येस बँक ते गॅस सिलिंडर, 1 मे पासून 'हे' नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
मसाल्यांमुळे होऊ शकतो कॅन्सर? चार मसाल्यांची विक्री थांबवण्याचा आदेश!