World economy in 2023: जगातील एकतृतीयांश भागाला 2023 ला मंदीचा फटका बसणार, IMF च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांचा इशारा
कोरोना महासाथीच्या काळात अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर अर्थव्यवस्थावर पूर्वपदावर येऊ लागली होती. मात्र वर्षाच्या सुरूवातीला चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
World economy in 2023: जगातील एकतृतीयांश भागाला या वर्षी मंदीचा फटका बसेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी दिला आहे. अमेरिकेलाही झळ बसेल पण अर्धेअधिक युरोपियन महासंघ आणि चीनसाठी यंदाचे वर्ष खूप कठीण जाण्याची भीती त्यांनी या वेळी व्यक्त केली आहे. ज्या देशांत मंदी नाही अशा देशातील लाखो लोकांनाही झळ बसणार आहे.
कोरोना महासाथीच्या (CoronaVirus) काळात अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर अर्थव्यवस्थावर पूर्वपदावर येऊ लागली होती. आता, मात्र वर्षाच्या सुरूवातीला चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने मोठा इशारा दिला आहे. 2023 हे 2022 च्या तुलनेने कठीण असणार आहे. या वर्षी 2023 मध्ये जगातील एक तृतीयांश भागाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो असा इशारा आयएमएफने दिला आहे.
IMF ने जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीन (China Economy) इशारा दिला आहे. चीनला 2023 पासून कठीण प्रसंगाचा सामना करावा लागणार आहे. 40 वर्षांत प्रथमच चीनला मंदीचा सामना कपावा लाणार आहेय अगोदर चीनमध्ये अशी परिस्थिती कधी आली नाही. पुढील काही महिने चिनसाठी कठिण असणार आहे. चिनच्या विकासावर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक विकासावर देखील याचा नकारात्मक परिणाम होणार आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा ( Kristalina Georgieva) म्हणाल्या, रशिया - युक्रेन युद्ध, वाढते व्याजदार आणि चीनमधील कोरोनाचे संकट या सर्व गोष्टींमुळे जागतिक विकासावर परिणाम होत आहे. रशियानं युक्रेनवर केलेला हल्ला, तेलाच्या वाढत्या किंमती आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्या तुलनेत लोकांचं उत्पन्न वाढलेलं नाही. त्यामुळे जगातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्थेची गती मंदावत असल्याचे क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी सांगितले.
जगातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्थेची गती मंदावत असल्याचे क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी सांगितले. जागतिक अर्थव्यवस्थेवर आलेलं हे संकट कायमस्वरुपी नसून अनेक अर्थव्यवस्था यातून बाहेर पडतील, असा विश्वास क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी व्यक्त केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या :