एक्स्प्लोर

RBI : महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर आरबीआयकडून निर्बंध, ठेवीदारांना फक्त 5000 रुपये काढता येणार, जाणून घ्या कारण

Reserve Bank Of India : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती सक्षम नसल्यानं  हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील सार्वजनिक, खासगी आणि सहकारी क्षेत्रातील बँकांकडून बँकिंग कायद्याचं आणि नियमांचं पालन केलं जातं की नाही यावर लक्ष ठेवलं जातं. बँकांची आर्थिक स्थिती योग्य नसल्यास ठेवीदारांच्या ठेवींचं संरक्षण करण्यासाठी वेळीच पावलं उचलली जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 7 नोव्हेंबरच्या प्रसिद्धीपत्रकानुसार महाराष्ट्रातील द पुसद अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुसदवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तर श्री गुरु राघवेंद्र सहकारा बँक नियामिथा, बंगळुरुवर घालण्यात आलेल्या निर्बंधांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

द पुसद अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकिंग नियमन कायद्याच्या सेक्शन 35 अ आणि सेक्शन 56 नुसार  मिळालेल्या अधिकारांनुसार द पुसद अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर निर्बंध घातले आहेत. 7 नोव्हेंबरला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर बँकेला आरबीआयच्या लेखी परवानगीशिवाय   कर्ज वितरण करणे किंवा जुन्या कर्जाचं नुतनीकरण करणे, गुंतवणूक करणे, दुसरीकडून पैसे घेणे, नव्या ठेवी स्वीकारणे किंवा पैसे अदा करण्याचं आश्वासन देणे यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय बँकेची मालमत्ता आणि असेटस याची विक्री, हस्तांतरण किंवा इतर मार्गानं विल्हेवाट लावण्यास मनाई करण्यात आली आहे. आरबीआयचा 6 नोव्हेंबरचा आदेश बँकेच्या दर्शनी भागात आणि वेबसाईटवर सार्वजनिक हितासाठी प्रकाशित करण्यास सांगण्यात आलं आहे. 

बँकेची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन  ठेवीदारांना 5000 रुपयांपर्यंतची रक्कम त्यांच्या बचत खात्यातून किंवा चालू खात्यातून काढता येईल. बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे, वीज बिल इत्यादीसाठी खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

आरबीआयनं हे निर्बंध बँकेची कमी होत चाललेली लिक्विडिटी लक्षात घेता लादले आहेत. आरबीआयनं यापूर्वी बँकेच्या संचालकांशी वरिष्ठ व्यवस्थापनासोबत बँकेच्या सुधारणेसंदर्भात चर्चा केली होती. बँक व्यवस्थापनाकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्यानं अखेर ठेवीदारांचं हित लक्षात घेता आवश्यक पावलं उचलल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. 

द पुसद अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पात्र ठेवीदारांच्या डीआसीजीसीच्या नियमाप्रमाणं 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण आहे. त्यासंदर्भातील अधिक माहितीसाठी ठेवीदार बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करु शकतात. किंवा डीआयसीजीसीच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं द पुसद अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहेत. बँकेचा परवाना रद्द केलेला नाही. हे निर्बंध सहा महिन्यांच्या कालावधीसाठी आहेत. आरबीआयकडून बँकेकडून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय प्रयत्न केले जातात यावर लक्ष ठेवलं जाणार आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget