(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RBI Monetary Policy : यंदा जीडीपी 7.2 टक्के राहण्याचा अंदाज; जाणून घ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातील महत्वाचे 10 मुद्दे
RBI Monetary Policy IMP Points:रिझर्व्ह बँकेने आज आपले पतधोरण जाहीर केले. यंदाच्या पतधोरणातील महत्वाचे 10 मुद्दे जाणून घ्या...
RBI Monetary Policy Update: रिझर्व्ह बँकेने आज आपले पतधोरण जाहीर केले. यंदा अपेक्षेनुसार व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल न करता तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. तर, रिर्व्हस रेपो रेट 3.75 टक्के इतका करण्यात आला आहे. सलग 11 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, भू-राजकीय संघर्षाचा परिणाम अनेक अर्थव्यवस्थांवर होत आहे. भारतासाठीदेखील हा आव्हानात्मक काळ आहे. देशात महागाई दर वाढण्याचाही अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा मान्सून सरासरी राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बाजारातील घडामोडी पाहून धोरणात बदल करण्यात येईल असेही दास यांनी सांगितले.
महत्वाच्या 10 घोषणा अशा...
रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे, आरबीआयच्या पतधोरणाची घोषणा
रेपो रेट 4 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 3.5 टक्क्यांवरच, कोणताही बदल नाही
सुरु आर्थिक वर्षात जीडीपी 7.2 टक्के राहण्याचा अंदाज
2023 सालसाठीचा अंदाजित जीडीपी 7.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर घसरला, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे विधान
येत्या काही दिवसात महागाईची झळ बसण्याचा अंदाज, महागाई दर 5.7 टक्के राहण्याची शक्यता
महागाई दर 4.5 टक्क्यांवरुन वाढून 5.7 टक्के राहण्याचा अंदाज
एप्रिल-जूनमध्ये किरकोळ महागाई दर 6.3 टक्के राहण्याचा अंदाज
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती अंदाजे सरासरी 100 डॉलर प्रति बॅरल राहण्याचा अंदाज
कोव्हिड, युक्रेन-रशिया युद्ध आणि ह्या सर्वांमुळे तयार झालेल्या अस्थिरतेमुळे येत्या काळात भारताला महागाईची झळ पोहोचणार,
सोबतच भारताच्या विकासचा वेग देखील मंदावण्याची भीती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.