'...उत्सव साजरा करू नका,' RBI च्या माजी गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य, नेमकं कारण काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी भारताची अर्थव्यवस्था आणि विकासदर यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे.
हैदराबाद : सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha Election 2024) राजकीय पक्ष वेगवेगळी आश्वासने देत आहेत. सत्ताधारी भाजपकडून लवकरच आपला देश जगातील सर्वांत मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जातो. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर (आरबीआय) डी सुब्बाराव (Former Governor D Subbarao) यांनी मोठं विधान केलं आहे. भारताची अर्थव्यवस्था वाढत असली तरी आपला देश गरीबच राहू शकतो, असं ते म्हणाले आहेत. ते हैदराबादमध्ये एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असला तरी भारत गरीबच कसा राहू शकतो, हे सांगताना त्यांनी सौदी अरेबिया (Saudi Arabia) या देशाचा दाखला दिला आहे. देश श्रीमंत झाला म्हणजे देश विकसित झाला, असे होत नाही, असे सुब्बाराव यावेळी म्हणाले.
उत्सव साजरा करण्याची गरज नाही
आम्ही सत्तेत आल्यास माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील सर्वांत मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येईल, असे मोदी अनेकवेळा म्हणाले आहेत. अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भविष्यात अमेरिका आणि चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येऊ शकतो. हाच धागा पकडून सुब्बाराव म्हणाले की, 'भारत हा जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपला येऊ शकतो. ते शक्य आहे. मात्र यामुळे उत्सव साजरा करण्याची गरज नाही.'
ब्रिक्स आणि जी-20 देशांच्या तुलनेत भारत सर्वांत गरीब देश
तसेच पुढे बोलताना आपण एक मोठी अर्थव्यवस्था आहोत, कारण आपल्याकडे 1.40 अब्ज लोक आहेत. आपल्याकडे मनुष्यबळ अधिक आहे. त्यामुळेच आपण मोठी अर्थव्यवस्था आहोत. मात्र मोठी अर्थव्यवस्था असलोत तरी आपण अजूनही एक गरीब देशच आहोत. भारता ब्रिक्स आणि जी-20 देशांच्या तुलनेत सर्वांत गरीब देश आहे, असेही सुब्बाराव म्हणाले.
सुब्बाराव यांनी सांगितल्या चार महत्त्वाच्या बाबी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत देश 2047 सालापर्यंत विकसित राष्ट्र असेल, असे सांगतात. पण सुब्बाराव यांनी देश विकसित राष्ट्र म्हणून नावारुपाला येण्यासाठी कायद्याचे राज्य, भक्कम देश, उत्तदायी आणि स्वायत्त संस्था असणे गरजेचे आहे, असेह सुब्बाराव म्हणाले.
हेही वाचा :
SIP च्या माध्यमातून तुम्हीही होऊ शकता करोडपती! फक्त 'या' सूत्राचं पालन करा!
मैदानात धावांची कमाई, गुंतवणुकीतही सिक्सर! धोनी भाईने पुण्यातल्या 'या' कंपनीत टाकले पैसे!
हिऱ्याच्या आकाराचा आलिशान बंगला, महागड्या गाड्या, शेतकरीपुत्र हजारो कोटींचा मालक कसा झाला?