एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ram Mandir : राम भक्तांसाठी रेल्वेची भेट; अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी 1000 हून विशेष ट्रेन सोडणार

Ram Mandir Inauguration Special Train : राम मंदिराच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्या 100 दिवसांत राम भक्तांची दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेने देशाच्या विविध भागांतून अयोध्येला 1,000 हून अधिक गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

Ram Mandir Inauguration : अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर (Ram Mandir) आता जवळजवळ सज्ज झाले आहे. 22 जानेवारी 2024 रोजी भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर भारतीय रेल्वेही (Indian Railway) या खास दिवसासाठी विशेष तयारी करत आहे. नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्या 100 दिवसांत राम भक्तांची दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेने देशाच्या विविध भागांतून अयोध्येला 1,000 हून अधिक गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष ट्रेन 19 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहेत.

प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केल्यानंतरच्या एका दिवसानंतर 23 जानेवारी 2024 रोजी मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घेता भारतीय रेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मूसह अनेक प्रमुख शहरांमधून अयोध्येला जाणाऱ्या विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. 

ट्रेनची संख्या वाढवणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागणी वाढल्यास गाड्यांची संख्या वाढवता येऊ शकते. पर्यटकांची अंदाजे वाढ लक्षात घेता अयोध्या स्थानकाचे नूतनीकरण केले जाऊ शकते. नवीन स्टेशनमध्ये दररोज 50 हजार प्रवाशांची क्षमता असेल. हे काम 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. रेल्वे सध्या राज्यांच्या मदतीने गाड्यांची संख्या आणि वेळापत्रकावर काम करत आहे. 

IRCTC कडून 24 तास जेवणाची व्यवस्था?

अयोध्येला भेट देणार्‍या पर्यटकांची मोठी संख्या पाहता, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) 24 तास भोजन सेवा प्रदान करण्याच्या तयारीवर काम करत आहे. यासाठी आयआरसीटीसीकडून अनेक पुरवठादारांशी चर्चा सुरू आहे. 

सात हजार जणांना आमंत्रण 

अयोध्येतील नव्या भव्य दिव्य राम मंदिरा रामलल्लांच्या अभिषेक प्रसंगी देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे. कलाकार, साहित्यिक, धार्मिक नेते आणि क्रीडा जगतातील मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. या प्राण प्रतिष्ठेसाठी 7 हजार जणांना आमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 22 जानेवारीला अयोध्येतील नव्या राम मंदिराचे उद्घाटन (Ayodhya Ram Lalla New Grand Teample) करतील आणि त्यांच्या हस्ते रामलालाचा अभिषेकही केला जाईल. 

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, फिल्म स्टार अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह जवळपास सात हजार जणांना, राम मंदिरात राम ललांच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवलं आहे. याशिवाय, दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या 'रामायण' मालिकेत भगवान श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी 1992 मध्ये मारल्या गेलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. आमंत्रित व्हीव्हीआयपींमध्ये राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, योग गुरु राम देव, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपति गौतम अदाणी यांचा समावेश आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget