एक्स्प्लोर

आईसाठी एक संरक्षक कवच: आरोग्य विमा करणार 'तिच्या' प्रवासाचे संरक्षण!

Mother Health Insurance: हे विमा संरक्षण अगदी गर्भधारणा आणि प्रसूतीपासून, प्रसवोत्तर  काळजी आणि बालसंगोपनापर्यंत जीवनाच्या सर्व टप्प्यांवर लागू होते.

Mother Health Insurance: वैद्यकीय खर्च आणि अनपेक्षित आरोग्य समस्यांचे प्रमाण वाढत असताना, विमा आता फक्त बॅकअप योजना न राहता एक विचारपूर्वक गुंतवणूक ठरतो आहे. महिलांसाठी, विशेषतः मातांसाठी, संपूर्ण आरोग्य विमा संरक्षण हे एक महत्त्वाचे सुरक्षा कवच ठरते. यामुळे अनपेक्षित वैद्यकीय खर्चांपासून कुटुंबावरील अर्थसंकट वाचते. हे विमा संरक्षण अगदी गर्भधारणा आणि प्रसूतीपासून, प्रसवोत्तर  काळजी आणि बालसंगोपनापर्यंत जीवनाच्या सर्व टप्प्यांवर लागू होते. दीर्घकालीन नियोजनाचे महत्त्व यातून अधोरेखित होते. 

मातृत्वाच्या प्रवासात आरोग्य विमा महिलांना कशाप्रकारे साथ देतो?

गर्भधारणेशी संबंधित वैद्यकीय खर्च अनेक वेळा लाखो रुपयांमध्ये जातो. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर आर्थिक ताण येऊ शकतो. नॅशनल हेल्थ सर्व्हे 5 नुसार, भारतातील 21.5% जन्म सध्या सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे होतात. त्यामुळे मातृत्व, प्रसूती देखभालीच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामी, सध्या सर्व प्रकारच्या आरोग्य विमा दाव्यांमध्ये मातृत्वाशी संबंधित दाव्यांचे प्रमाण  सुमारे 20% आहे. मेट्रो शहरांमध्ये सिझेरियन ऑपरेशनचा खर्च 75,000 रु. ते 2,00,000 रु. दरम्यान असतो, तर सामान्य प्रसूतीचा खर्च साधारणपणे 50,000 ते 1,00,000 रु. पर्यंत असतो. जर गर्भधारणा किंवा प्रसूतीदरम्यान काही गुंतागुंत उद्भवली, तर हे खर्च आणखी वाढू शकतात. नव्या जीवाचे स्वागत करण्याचा आनंद घेण्याच्या क्षणी आर्थिक चिंता ही आपल्या मनाला भेडसावणारी सर्वात शेवटची गोष्ट असावी. म्हणूनच सुरुवातीपासूनच मातृत्व व प्रसूती पश्चात असे दोन्ही खर्च संरक्षित करेल अशा चांगल्या आरोग्य विमा योजनेची निवड करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही गर्भधारणेचा प्रवास तणावमुक्तपणे अनुभवू शकाल, त्याचा आनंद घेऊ शकाल. 

इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने मातृत्वाशी संबंधित खर्चासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये प्रसवपूर्व आणि प्रसवोत्तर वैद्यकीय खर्च तसेच नवजात अर्भकाचे बालसंगोपन यांचा समावेश आहे. यामध्ये वैध व वैद्यकीय गर्भपाताचाही समावेश आहे. मात्र, ही सुविधा विमाधारकाच्या आयुष्यात जास्तीत जास्त दोन प्रसूती किंवा गर्भपातांपर्यंतच मर्यादित आहे. शिवाय, सिझेरियन असो किंवा सामान्य प्रसूती—रुग्णालयात भरतीदरम्यान होणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा समावेशही केला जातो.
आईसाठी एक संरक्षक कवच: आरोग्य विमा करणार 'तिच्या' प्रवासाचे संरक्षण!

प्रतिबंधात्मक आरोग्याची ताकद: मातांनी आरोग्य स्वास्थ्य गुंतवणुकीकडे का वळले पाहिजे

माता त्यांचे लक्ष फक्त मुलांच्या संगोपनावर केंद्रित करत असतात. यामुळे अनेकदा मातांचे आरोग्य त्यांच्या स्वत:साठी दुय्यम ठरते. त्यामुळे कुटुंबांनी महिलांसाठी वेलनेस इन्सेंटिव्ह्स आणि प्रतिबंधात्मक तपासणीचा समावेश असलेल्या आरोग्य विमा योजनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आरोग्यावर लक्ष ठेवण्यास आणि आजार टाळण्यास मदत करतील असे आरोग्य स्वास्थ्य लाभ असलेली विमा योजना निवडली पाहिजे. उदाहरणार्थ, वार्षिक आरोग्य तपासणी करणे, तंदुरुस्त राहण्यासाठी काही उपाययोजना करणे, फिटनेस वर्गांमध्ये सहभागी होणे अशा गोष्टींवर आरोग्य विमा योजना स्वास्थ्य लाभ सवलतही देतात. या प्रतिबंधात्मक उपायांमुळे गंभीर आणि प्राणघातक आजारांचे लवकर निदान व उपचार शक्य होते. गंभीर आजाराचे निदान व उपचारांसाठी संपूर्ण विमा संरक्षण असेल अशा योजनेचा विचार करा. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्याबरोबर बरे होण्यावर लक्ष केंद्रित करता येईल.

आरोग्यदृष्ट्या सुरक्षित घर निर्माण करणे: वाढत्या कुटुंबासाठी फॅमिली फ्लोटर योजना

फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना संपूर्ण कुटुंबाला विमा संरक्षण देते आणि त्यामुळे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या योजना घेण्याची गरज भासत नाही. संपूर्ण कुटुंबाच्या विमा संरक्षणासाठी एकच प्रीमियम भरावा लागतो. यामध्ये तुम्ही स्वतः, तुमचे जोडीदार आणि अवलंबून असलेली मुले यांचा समावेश करू शकता. काही योजना भावंडे, सासू-सासरे आणि अवलंबून असलेल्या पालकांचाही समावेश करू देतात. मातांसाठी विमा योजना घेताना, सर्व पॉलिसी कागदपत्रे नीट तपासणे अत्यावश्यक आहे. तसेच, विमा सल्लागाराचा सल्ला घेऊन नियम आणि अटी समजून घेणे उपयुक्त ठरते. पॉलिसी कालावधी, सम इंश्युअर्ड पर्याय आणि आवश्यकतेनुसार कुटुंबातील सदस्याचा समावेश देणारी लवचिकता असलेल्या योजनेचा विचार करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारात उपलब्ध इतर योजनांच्या तुलनेत स्पर्धात्मक, वाजवी प्रीमियम दरात उच्च सम इंश्युअर्ड असलेली योजना निवडणे अधिक फायदेशीर ठरेल.

आरोग्य विमा ही काळजी आणि प्रेमाची कृती आहे. ती कुटुंबाला दररोजच्या आरोग्यप्रती सजग राहण्यास प्रवृत्त करते. मातांसाठी, आरोग्य विमा योजना वेळेवर उपचार, आरोग्यदायी जीवनशैली, आणि नियमित तपासणीस प्रोत्साहन देते. विमा हे घरातील काळजी आणि सुरक्षेचे अदृश्य नाते संरक्षित करतो. प्रत्येक कुटुंब सदस्याच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष न करता त्याच्या आरोग्याला प्राधान्य देतो.

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: 'प्रियजनांना गमावलेल्यांप्रती संवेदना', PM Narendra Modi यांची X पोस्टद्वारे प्रतिक्रिया
Delhi Blast: दिल्ली स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट, Siddhivinayak मंदिरात सुरक्षा वाढवली
Delhi Blast Probe : i20 कार Faridabad वरून Delhi त, Sunheri Masjid जवळ संशयित कैद
Delhi Blast : 'ती कार आमची नाही', Pulwama तील Amir-Umar च्या कुटुंबीयांचा दावा, तिघे ताब्यात
Delhi Blast: दिल्ली स्फोटावर Amit Shah यांची उच्चस्तरीय बैठक, NIA चे DG Sadanand Date उपस्थित.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Embed widget