एक्स्प्लोर

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणे तर दूर आता भडका उडण्याची भीती

Crude Oil Price: कच्च्या तेलाचे दर कडाडले असून मागील 11 महिन्यातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

नवी दिल्ली : आगामी चार राज्यातील निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या (LPG Price) दरात कपात केल्यानंतर अनेकांना पेट्रोल, डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात कपात होईल अशी आशा आहे. मात्र, इंधन दरात दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील काही दिवसांत कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने इंधन दरात कपात होण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे. 

सौदी अरेबिया आणि रशियाने कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 5 सप्टेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दोन्ही देशांच्या या निर्णयानंतर 2022 नंतर प्रथमच कच्च्या तेलाचे दर  प्रति बॅरल 90 डॉलरच्या पुढे गेले आहेत. 

ब्रेंट क्रूड ऑईलचे दर प्रति बॅरल 1.34 टक्क्यांनी वधारले असून मागील 11 महिन्यातील उच्चांकी दर 90.19 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. तर, WTI क्रूड ऑईलचे दर 1.66 टक्क्यांनी वधारत प्रति बॅरल 87.16 डॉलर इतके झाले आहे. तेल उत्पादक देश असलेल्या सौदी अरेबिया आणि रशियाने डिसेंबर 2023 पर्यंत 1.3 दशलक्ष बॅरल इतके कच्च्या तेलाचे उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया पुढील महिन्यात कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्यााबाबत अथवा वाढवण्याबाबतच्या निर्णयाचा फेरआढावा घेणार आहे. सौदी अरेबियाप्रमाणेच आता रशियाही कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करत आहे. त्याचवेळी रशियानेही या काळात कच्च्या तेलाची निर्यात दररोज 3 लाख बॅरलने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सौदी अरेबिया आणि रशियाच्या या निर्णयामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या, त्यानंतर निवडणुका लक्षात घेऊन सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र कच्च्या तेलाच्या किमतीत या वाढीनंतर सरकारला किंमती कमी करणे कठीण होणार आहे.

2023 मध्ये, जेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 ते  80 डॉलरच्या आसपास असताना, सरकारी ऑईल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात न करता नफा मिळवला. या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला नाही. अशा परिस्थितीत आता कच्च्या तेलाने प्रतिबॅरल ९० डॉलरचा टप्पा ओलांडला असताना आता सरकारी कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करतील का, याबाबत शंका निर्माण झाली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं  
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं  
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
Embed widget