Petrol Diesel Price : 'या' शहरांत पेट्रोलचे दर घसरले, तुमच्या शहरातील इंधन दर झटपट चेक करा
Petrol Diesel Today : देशातील काही शहरामध्ये आज पेट्रोल-डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे. तुमच्या शहरातील इंधन दर झटपट चेक करा.
![Petrol Diesel Price : 'या' शहरांत पेट्रोलचे दर घसरले, तुमच्या शहरातील इंधन दर झटपट चेक करा petrol diesel price today on 12 march 2023 know where fuel cheaper and expensive Petrol Diesel Price : 'या' शहरांत पेट्रोलचे दर घसरले, तुमच्या शहरातील इंधन दर झटपट चेक करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/4aee9ffc2e6ba992f185a2da6042816c1678067822639369_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार कायम आहे. भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Rate) दरांनुसार, देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केलेली नाही. मागील काही दिवस आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार सुरुच आहे मात्र, तेव्हाही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही दिलासा मिळाला नव्हता. आज 291 दिवस देशात पेट्रोल-डिझेलचं दर स्थिर आहेत.
देशातील प्रमुख तेल कंपन्या दररोज नवीन इंधन दर जारी करतात. भारतीय तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. मात्र, देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
देशाची राजधानी नवी दिल्लीत पेट्रोलचे दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 89.62 रुपये प्रति लिटर आहेत. मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलची किंमत 94.27 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोल कुठं स्वस्त आणि कुठं महाग झालं?
उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पेट्रोल 96.76 रुपयांनी विकलं जात असून त्यात 11 पैशांनी वाढ झाली आहे तर, डिझेलचा दर 89.93 आहे आणि त्यातही 11 पैशांनी वाढ झाली आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे. गुरुग्राममध्ये डिझेल 16 पैसे स्वस्त झालं असून 89.72 रुपये प्रति लीटर आहे. तर, पेट्रोल 96.84 रुपये प्रति लिटर म्हणजे 17 पैसे स्वस्त झालं आहे.
लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि 89.76 रुपये आहे, त्यात 05 पैशांनी घट झाली आहे. पाटणामध्ये इंधन 0.32 रुपयांनी महागले आहे. येथे पेट्रोल 107.59 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.36 रुपये प्रति लिटर आहे.
कच्च्या तेलाच्या किमती
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत दररोज चढ-उतार पाहायला मिळत आहेत. क्रूड ऑइल WTI प्रति बॅरल $76.68 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल $ 82.64 आहे. काही काळापासून कच्च्या तेलाच्या किंमतीतील बदलाचा इंधनाच्या दरावर परिणाम झालेला नाही. देशात तेलाच्या किमती स्थिर आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)