एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ambani Family Educational Details : उद्योगपती अंबानी कुटुंबात कोण किती शिकलं आहे माहितीय? वाचा सविस्तर

Ambani Family Educational Details : राधिका मर्चंटपासून ते नीता अंबानीपर्यंत, जाणून घ्या अंबानी कुटुंबातील सर्वात शिक्षित सदस्य कोण आहे?

Ambani Family Educational Details : उद्योगपती अंबानी कुटुंब (Ambani Family) हे देशातीलच नाहीतर जगातील सर्वात प्रसिद्ध कुटुंब आहे. दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांनी शून्यातून सुरुवात केली आणि अंबानी कुटुंबाच्या व्यवसायाचा पाया घातला. धीरूभाई यांचा व्यवसाय त्यांच्या कुटुंबाने अधिक विस्तारला. त्यांची मुलं मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी अंबानी कुटुंबाचं नाव जागतिक स्तरावर पोहोचवलं.

अंबानी कुटुंबातील लोकांचं किती शिक्षण झालं आहे हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या...

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती दिवंगत धीरूभाई अंबानी यांचे पुत्र आहेत. धीरूभाई अंबानी हे भारतीय उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक होते. अंबानी कुटुंब हे देशातील सर्वात प्रसिद्ध कुटुंब आहे. अशा स्थितीत अंबानी कुटुंबात कोणाचं शिक्षण जास्त आहे, वाचा सविस्तर...

Mukesh Ambani : मुकेश अंबानी

मुकेश अंबानी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईतून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. पुढे ते MBA करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. पण त्यानंतर 1980 मध्ये त्यांना रिलायन्स कंपनीसाठी परत भारतात यावं लागलं, त्यामुळे त्यांनी एमबीएचं शिक्षण अर्धवट सोडलं.

Nita Ambani : नीता अंबानी

मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचं प्राथमिक शिक्षण रोज मॅनर गार्डनमधून झालं आहे. त्यांनी पुढील शिक्षण मुंबईच्या नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पूर्ण केलं आहे. अभ्यासासोबतच त्यांना नृत्याचीही खूप आवड आहे. लग्नानंतर त्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यानंतर त्या धीरूभाई अंबानी शाळेचे संस्थापिका झाल्या.

Isha Ambani : ईशा अंबानी

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने साऊथ एशियन स्टडीज आणि सायकोलॉजीमध्ये पदवी शिक्षण घेतलं आहे. यानंतर, 2014 पासून, तिने रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ कंपनीचं काम हाताळण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये, ईशा अंबानीचे नाव आशियातील शक्तिशाली आघाडीच्या व्यावसायिक महिलांमध्ये सामील होतं.

Akash Ambani : आकाश अंबानी

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीने सुरुवातीचं शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमधून केलं. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून 2009 मध्ये आयबी डिप्लोमा प्रोग्राम पूर्ण केला. त्यानंतर 2013 मध्ये ब्राउन युनिव्हर्सिटी, यूएसए मधून बिझनेस-कॉमर्समध्ये पदवी शिक्षण घेतलं.

Sholka Mehta Ambani : श्लोका मेहता-अंबानी

आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहतानं प्रिन्सटन युनिव्हर्सिटी, न्यू जर्सी, यूएसएमधून मानववंशशास्त्र (Anthropology) पदवी शिक्षण घेतलं आहे. याशिवाय तिला समाजकार्य करायला खूप आवडतं. 

Anant Ambani : अनंत अंबानी

अनंत अंबानीने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर र्‍होड आयलंडमधील ब्राऊन विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलं. 

Radhika Merchant Ambani : राधिका मर्चंट-अंबानी

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची धाकटी सून राधिका मर्चंटने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूल आणि बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून केलं. यानंतर तिनं 2017 मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेतली. 

Anil Ambani : अनिल अंबानी

धीरूभाई अंबानी यांचा धाकटा मुलगा आणि मुकेश अंबानी यांचा भाऊ अनिल अंबानी यांनी किशनचंद चेलाराम महाविद्यालयातून सायन्समधून ग्रॅज्युएशन केलं आहे. तसेच पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून बिझनेझ ॲडमिनिस्ट्रेशनमधून मास्टर्स पूर्ण केलं आहे.

Tina Ambani : टीना अंबानी

अनिल अंबानी यांची टीना अंबानीने 1975 मध्ये फेमिना टीन प्रिसेंस खिताब जिंकला. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. त्यांचं आर्ट्समधून पदवी शिक्षण पूर्ण झालं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकरABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
Embed widget