![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Petrol Diesel Price Today: गाडीत पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी झटपट चेक करा आजचे दर
Petrol Diesel Price Today: आजही देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर. झटपट चेक करा तुमच्या शहरांतील दर...
![Petrol Diesel Price Today: गाडीत पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी झटपट चेक करा आजचे दर Petrol Diesel Price 17 January 2023 petrol diesel price today latest news update on january 17 citiwise full list Petrol Diesel Price Today: गाडीत पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी झटपट चेक करा आजचे दर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/1a1671c587cdc82c2dd0f2c81df6e9771670552973444584_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Petrol Diesel Price 17 January 2023: जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये (Crude Oil) थोडीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या कच्चं तेल प्रति बॅरल 84 डॉलरच्या वर पोहोचलं आहे. अशातच भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol-Diesel Price) कोणताही बदल केलेला नाही. आज (मंगळवारी) देशातील महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
कच्च्या तेलाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या 24 तासांत त्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत आज जवळपास एका डॉलरनं घसरून प्रति बॅरल 84.11 डॉलरवर पोहोचली आहे. WTIची किंमत देखील सुमारे 0.80 डॉलरनं घसरून 78.77 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे.
देशातील महानगरांत आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत किरकोळ बदल झाला आहे. महाराष्ट्रात जुलै महिन्यापासून इंधन दर स्थिर आहेत. जुलै महिन्यात राज्य सरकारने पेट्रोलचे दर प्रति लिटर 5 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील इंधन दर स्थिर आहेत.
Petrol Diesel Price Today : देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचे दर काय?
शहरं | पेट्रोलचे दर (प्रति लिटर) | डिझेलचे दर (प्रति लिटर) |
दिल्ली | 96.72 रुपये | 89.62 रुपये |
मुंबई | 106.31 रुपये | 94.27 रुपये |
कोलकाता | 106.03 रुपये | 92.76 रुपये |
चेन्नई | 102.63 रुपये | 94.24 रुपये |
Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)