एक्स्प्लोर

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? वाढले की, घटले?

Petrol Diesel Price : 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

Petrol Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) अपडेट केले आहेत. आजही वाहनचालकांना दिलासा कायम आहे. प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम आहेत. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत शेवटचा बदल गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल दीड वर्ष पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. 

एकीकडे देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार सुरूच आहेत. सुमारे 85 डॉलर प्रति बॅरल राहते. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 84.77 डॉलर आणि WTI क्रूड प्रति बॅरल 80.15 डॉलरवर व्यवहार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळापासून मर्यादित आहेत. यापूर्वी, कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झाली होती आणि त्याची किंमत प्रति बॅरल 75 डॉलर वरून 85 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढली होती.

देशांतील महानगांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती काय? 

देशाच्या राजधानी दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर, येथे पेट्रोलची किंमत प्रति लिटर 96.72 आणि डिझेलची किंमत 89.62 प्रति लिटर आहे. याशिवाय मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 तर डिझेलचा दर 94.27 प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा दर 94.24 प्रति लिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 आणि डिझेल 92.76 प्रति लिटरनं विकलं जात आहे.

राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

  • पुणे : पेट्रोल 106.22 प्रति लिटर, डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर 
  • नाशिक : पेट्रोल 106.51 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर 
  • रत्नागिरी : पेट्रोल 107.79 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर 
  • सिंधुदुर्ग : पेट्रोल 107.97 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 107.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर 
  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • गोंदिया : पेट्रोल 107.56 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.05 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता होतात दर अपडेट 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget