एक्स्प्लोर

Petrol Diesel Rate: सर्वसामान्यांना दिलासा मिळणार? पुढच्या महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी घट होण्याची शक्यता

Petrol Diesel Rate: पुढच्या महिन्यात सर्वसामान्यांना गूड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. गगनाला भिडलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये पुढच्या महिन्यात घट केली जाऊ शकते, अशी माहिती मिळत आहे.

Petrol Diesel Rate: नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel) किमती गगनाला भिडलेल्या आहेत. पण, आता पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये (Petrol Diesel Price) पुढच्या महिन्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महागाईची (Inflation) झळ सोसत असलेल्या सर्वसामान्यांना ऑक्टोबरमध्ये दिसाला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती झपाट्यानं खाली येऊ शकतात, असं बोललं जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेल उत्पादक देशांपैकी एक असलेला सौदी अरेबिया आशियामध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या जवळपास सर्व श्रेणीच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. मध्यपूर्वेतील बेंचमार्क दुबईतील घसरणीमुळे सौदी अरेबिया हे पाऊल उचलू शकते, अशी माहिती मिळत आहे. सौदी अरेबियानं जर असा निर्णय घेतला, तर भारतासाठी दिलासादायक बाब ठरू शकते. स्वस्त क्रूडच्या उपलब्धतेमुळे देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या किमती कमी करू शकतात. 

सौदी अरेबिया अरब लाईट क्रूडची किंमत कमी करणार 

इकॉनॉमिक टाइम्सनं उद्योगातील सूत्रांचा हवाला देत मंगळवारी आपल्या अहवालात म्हटलं आहे की, सौदी अरेबिया यावर गांभीर्यानं विचार करत आहे. अहवालानुसार, अरब लाईट क्रूडची (Arab Light Crude) अधिकृत विक्री किंमत (OSP) ऑक्टोबरमध्ये प्रति बॅरल 50 ते 70 सेंट्सनं घसरण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात दुबईच्या किमतींमध्येही असाच ट्रेंड दिसून आला आहे. रॉयटर्सच्या सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या 5 पैकी 3 रिफायनिंग स्त्रोतांनी देखील याबद्दल माहिती दिली आहे. 

चीनमध्येही सातत्यानं क्रूड ऑईलच्या मागणीत घट 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनकडून सातत्यानं कमी होणारी क्रूड ऑईलची मागणी, हेदेखील क्रूड ऑईलच्या किमतींत घट केली जाण्यामागे मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. चीनमधील रिफायनिंग मार्जिन कमकुवत झालं आहे. तेथील उत्पादन आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी आहे. याचाच परिणाम पेट्रोल-डिझेलच्या मागणीवरही झाल्याचं दिसून येत आहे. एका सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, एकूण मार्जिन खराब झालं आहे. चीनमध्ये तर परिस्थिती आणखी वाईट आहे. साधारणपणे सप्टेंबरमध्ये तेलाची मागणी मोठी असते, पण यंदा तसं पाहायला मिळत नाहीये, यंदा कच्च्या तेलाच्या मागणीत प्रचंड घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

ओपेक देशही उत्पादन वाढवण्याच्या तयारीत 

दुसरीकडे, OPEC+ चा पुरवठाही ऑक्टोबरपासून वाढणार आहे. ओपेक गटातील आठ सदस्यांनी पुढील महिन्यात दररोज 180,000 बॅरल उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे. प्रतिदिन 2.2 दशलक्ष बॅरल (BPD) उत्पादन मर्यादा काढून टाकण्याच्या योजनेचा हा भाग आहे. दरम्यान, गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुबई बेंचमार्क मजबूत झाल्यामुळे ऑक्टोबरसाठी अरब लाईटचा ओएसपी थोडा बदलेल अशी अपेक्षा आहे. अरब मध्यम (Arab Medium) आणि अरब हेवीच्या (Arab Heavy)  जोरदार मागणीमुळे किंमती 50 सेंटपेक्षा कमी होऊ शकतात. सौदी क्रूड OSP सहसा दर महिन्याच्या 5 तारखेच्या आसपास सोडले जातात. यामध्ये इराण, कुवेत आणि इराकसाठीही कल सेट झाला आहे. याचा परिणाम आशियासाठी असलेल्या सुमारे 9 दशलक्ष bpd कच्च्या तेलावर होतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Khokya News | सहा दिवस खोक्या होता कुठे? खोक्याला बेड्या कश्या ठोकल्या? ते खोक्याच्या घरावरील कारवाई; संपूर्ण व्हिडीओTop 100 News : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : Maharashtra News : 7 PmLadki Bahin Yojana  News | लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागांना फटका, अर्थमंत्री अजित पवारांवर इतर विभागांची नाराजीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 13 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Embed widget