एक्स्प्लोर
Advertisement
Tax Saving Schemes : ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरतात सरकारच्या या योजना, 1.5 लाखांपर्यंत बचतही करतात
Schemes For Senior Citizens : आर्थिक नियोजनात निवृत्तीनंतरचे नियोजन हे सर्वात महत्त्वाचं असून त्यासाठी कमी जोखीम आणि कर बचतीच्या उपायांमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे.
Tax Saving Schemes For Senior Citizens : आर्थिक नियोनजात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कर बचत. त्याचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास आपण आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करू सकतो. निवृत्तीच्या काळात आर्थिक नियोजन अधिक महत्त्वाचे ठरते. त्यामुळे आपल्या संपत्तीच्या वाढीसाठी कर नियोजन खूप महत्त्वाचा घटक बनला आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांनी कमी जोखीम आणि कर बचतीच्या उपायांमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे.
निवृत्तीनंतरही तुमचे कर दायित्व कमी करण्यासाठी, तुम्ही सर्वोत्तम बचत पर्याय शोधणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत. पण जे नागरिक फक्त जुन्या कर रचनेप्रमाणे कर भरतात त्यांच्यासाठीच हा पर्याय उपलब्ध असेल. जे नवीन कर रचनेप्रमाणे कर भरत असतील त्यांच्यासाठी हा पर्याय उपलब्ध नाही.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
कर बचतीचा विचार केला तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात चांगला पर्याय आहे. ही भारत सरकारची योजना आहे जी पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक आहे. पीपीएफमध्ये गुंतवणूक करून तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. पीपीएफ योजनेची परिपक्वता 15 वर्षे आहे, जी पाच वर्षांच्या अंतराने अनिश्चित काळासाठी नूतनीकरण केली जाऊ शकते.
कर बचत मुदत ठेव
आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, या प्रकारच्या एफडीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कर वाचवू शकता. अशा मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणारे ज्येष्ठ नागरिक वार्षिक 1.5 लाख रुपयांचा कर वाचवू शकतात. ज्येष्ठ नागरिक मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर व्याजाच्या स्वरूपात कर बचत एफडीमध्ये चांगले उत्पन्न मिळवतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या करबचत एफडीवर, ज्येष्ठ नागरिकांना इतरांच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो आणि लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो.
करमुक्त बाँड
करमुक्त बाँड्स योजनेमध्ये बॉण्डधारकांना दिलेले व्याज उत्पन्न करांपासून मुक्त आहे. त्यामुळे त्यांना निश्चित उत्पन्न गुंतवणुकीचा मार्ग उपलब्अध होतो. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सरकारी कॉर्पोरेशन, महानगरपालिका आणि इतर इन्फ्रा फर्म या सरकारच्या वतीने हे बाँड जारी करणाऱ्या संस्था आहेत. हे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय आहेत जे गुंतवणूकदारांना प्री-फिक्स्ड व्याजाच्या रूपात दरवर्षी कमाई देतात. शिवाय गुंतवणूकदार अधिक पैसे वाचवू शकतात. कारण त्यांना मिळणारे व्याज करमुक्त आहे. मूळ रक्कम इतर रोख्यांप्रमाणे मुदतपूर्तीवर परत केली जाते. असे रोखे NHAI, REC आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) द्वारे जारी केले जातात.
इक्विटी लिंक्ड बचत योजना (Equity Linked Savings Scheme)
जर तुम्ही मोठे परतावे आणि उत्तम कराच्या लाभाच्या शोधात असाल, तर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) हा एक उत्तम पर्याय आहे. यावेळी ELSS फंडांमध्ये गुंतवणुकीचे उद्दिष्ट अस्थिर परताव्याच्या ऐवजी सातत्यपूर्ण परतावा देणे हे आहे. कलम 80C अंतर्गत, ELSS फंडातील गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत कर लाभ मिळतो. ELSS चा तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी करमुक्त एफडीपेक्षा चांगला बनवतो, ज्याचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा असतो. इतर प्रकारच्या एफडींप्रमाणे, कर-बचत एफडीमध्ये कोणतीही तरलता नसते. तुम्हाला त्या एफडीवर कर्ज मिळत नाही किंवा तुम्ही त्यांची परतफेडही लवकर करू शकत नाही.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement