search
×

होम लोन, कार लोन, पर्सनल लोन; कर्ज घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर कुणाला चुकवावं लागेल कर्ज?

Utility News In Marathi : कर्जदाराचे हस्तांतरण कर्जाच्या प्रकारावर आणि कर्जाच्या रकमेवर तारण ठेवलेल्या वस्तूवर अवलंबून असते.

FOLLOW US: 
Share:

Who Repays Loan And How After Death Of A Borrower : छोट्या मोठ्या आर्थिक अडचणीसाठी कर्ज घेणं, आता सर्वसामान्य झालेय. पण ठरलेल्या कालावधीत कर्ज न चुकवल्यास कर्ज देणारा कर्ज घेणाऱ्याविरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. जर कर्ज चुकवण्याआधी कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर बँक सह-कर्जदार, गॅरेंटर अथवा कायदेशीर वारसदराकडून कर्ज वसूल करते.  पण ही गोष्ट लक्षात ठेवावी की, कर्जदाराचे हस्तांतरण कर्जाच्या प्रकारावर आणि कर्जाच्या रकमेवर तारण ठेवलेल्या वस्तूवर अवलंबून असते.  (Utility News In Marathi)

पर्सनल लोनला तांत्रिकदृष्ट्या असुरक्षित कर्ज म्हटले जाते. या कर्जाच्या प्रकारात बँक कायदेशीर वारस किंवा मृत कर्जदाराच्या कुटुंबातील हयात असलेल्या सदस्यांना थकबाकी भरण्यास सांगू शकत नाही. पर्सनल लोनच्या कर्जांमध्ये कोणतेही वस्तू गहाण ठेवलेली नसते, त्यामुळे वसुलीसाठी बँक कर्जदाराची कोणतीही मालमत्ता जप्त किंवा विकू शकत नाही. थकबाकीची रक्कम शेवटी बँकेमार्फत सवलत खात्यामध्ये टाकली जाते.  त्यानंतर बँकेद्वारे एनपीए खात्यात जोडलं जातं.  पण कर्जामध्ये जर सह अर्जदार असेल आणि मुख कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक सह अर्जदार व्यक्तीकडे कर्जाचे दायित्व हस्तांतरित करू शकते. हीच बाब इतर असुरक्षित कर्जांलाही लागू होते, त्यामध्ये क्रेडिट कार्डवरील कर्जाचाही समावेश आहे.  

दरम्यान, सध्या अनेक ठिकाणी असुरक्षित कर्ज घेताना कर्जदाराचा विमा काढण्यात येतो. जो कर्चाच्या रक्कमेइतका असतो. तसेच कर्ज परतफेडीच्या संपूर्ण कालावधीपर्यंत याची वैधता राहते. मुख्य कर्जदाराचा दुर्देवीरित्या मृत्यू झाला तर अशा स्थितीत बँक विमा कंपन्याकडून कर्जाची उर्वरित रक्कम वसूल करु शकते. अशा प्रकारच्या विम्याचा प्रीमियम कर्जदारालाच भरावा लागतो.
 
होम लोनच्या प्रकरणात जर मुख्य कर्जदाराचा कर्ज भरण्यापूर्वी मृत्यू झाला तर बँका सह अर्जदाराकडून उर्वरित कर्ज वसूल करु शकते. जर सह अर्जदार कर्ज चुकवू शकत नसेल तर बँक मुख्य कर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य, कायदेशीर वारसदार अथवा गॅरेंटरसोबत संपर्क करते. यांच्यापैकी कोणीही गृहकर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी स्वीकारल्यास, बँक ती मालमत्ता मालकांना परत करते. पण जर निर्धारित कालावधीत उर्वरित रक्कम चुकवण्याचं कुणीही आश्वासन देत नसेल तर बँक संपत्ती जप्त करुन विकू शकते.  यासारख्या प्रकरणात कर्जदाराचा कायदेशीर वारसदार बँकेकडे जाऊन कर्जाला रीस्ट्रक्चर करण्याचा आग्रह करु शकतो.  

कार लोन असताना एखाद्या कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक कर्जदाराच्या कायदेशीर वारसाला कर्ज भरण्यास सांगू शकते. जर कायदेशीर वारसानं कर्ज भरण्यास नकार दिला तर बँक कार अथवा गाडीला जप्त करु शकते. त्यानंतर बँक त्या कारचा लिलाव करुन आपली रक्कम वसूल करते.

Published at : 30 Sep 2022 03:47 PM (IST) Tags: Personal Finance HOME LOAN Bank Loan loan repayment personal loan Car Loan Utility News Loan Liability

आणखी महत्वाच्या बातम्या

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

टॉप न्यूज़

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर

और एक फायनल...एक कप की ओर