NPS : रिटायर्ड झाल्यानंतरही महिन्याला अडीच लाख कमावू शकता, 60 व्या वर्षी 5 कोटी हाती असतील; त्यासाठी असं नियोजन करा
National Pension System : नॅशनल पेन्शन सिस्टिम या योजनेच्या अंतर्गत थोड्या बचतीच्या माध्यमातून तुम्ही निवृत्तीवेळी कोट्यवधी रुपये कमावू शकता.
NPS : नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension System) हा सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. त्याद्वारे थोडीशी गुंतवणूक केल्यास तुम्हाला सेवानिवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम मिळू शकते. तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा अडीच लाख रुपये हवे असल्यास तुम्हाला वेगळ्या पद्धतीने गुंतवणुकीचे नियोजन करावे लागेल.
तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हालाही तुमच्या सेवानिवृत्तीची काळजी वाटत असेल. यामुळेच लोक रिटायरमेंट प्लॅनिंग करतात. पण त्यासाठी किती पैसे लागतात आणि पैसे कुठे गुंतवायचे याचा विचार आतापासूनच करायला हवा. हे देखील लक्षात ठेवणे गरजेचं आहे की तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितकी कमी दरमहा गुंतवणूक करावी लागेल. निवृत्ती नियोजनासाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक म्हणजे NPS (National Pension System), ज्याद्वारे थोडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला सेवानिवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम मिळेल.
काय आहे फॉर्म्युला?
ज्या तरुणांनी नुकतीच नोकरी सुरू केली आहे त्यांना हे सूत्र लागू आहे. समजा तुम्हाला निवृत्तीनंतर म्हणजे वयाच्या 60 व्या वर्षी 5 कोटी रुपये जमा करायचे आहेत आणि वयाच्या 25 व्या वर्षी तुम्हाला नोकरी मिळाली आहे, तर 25 व्या वर्षापासून दररोज तुमच्या पगारातून 442 रुपये वाचवायला सुरुवात करावं लागेल. वयाच्या 25 व्या वर्षापासून तुम्हाला रोज 442 रुपये NPS मध्ये गुंतवली तर तुमच्याकडे निवृत्तीनंतर 5 कोटी रुपये असतील.
5 कोटी रुपये कसे बनवायचे?
जर तुम्ही दररोज 442 रुपये वाचवत असाल तर याचा अर्थ तुम्हाला दरमहा सुमारे 13,260 रुपये जमा करता. जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत 35 वर्षे गुंतवणूक कराल. जर तुम्ही हे पैसे NPS मध्ये गुंतवले असतील तर तुम्हाला सरासरी 10 टक्के व्याज मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे चक्रवाढ व्याजासह तुमचे पैसे वयाच्या 60 व्या वर्षी 5.12 कोटी रुपये होतील.
तुम्ही NPS मध्ये दर महिन्याला 13,260 रुपये गुंतवल्यास 35 वर्षांत तुम्ही एकूण 56,70,200 रुपये गुंतवाल. आता प्रश्न असा पडतो की जर गुंतवणूक 56.70 लाख असेल तर 5 कोटी रुपये येणार कुठून? वास्तविक हे चक्रवाढीच्या सामर्थ्याने शक्य होईल. या अंतर्गत, तुम्हाला दरवर्षी केवळ तुमच्या मूळ रकमेवरच व्याज मिळणार नाही, तर तुम्हाला त्या मूळ रकमेवर मिळणाऱ्या व्याजावरही व्याज मिळेल. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही 35 वर्षांसाठी 56.70 लाख रुपये जमा करता तेव्हा तुम्हाला एकूण 4.55 कोटी रुपये व्याज मिळाले असेल. अशा प्रकारे तुमची एकूण गुंतवणूक 5.12 कोटी रुपये होईल.
आमच्या हातात पूर्ण रक्कम मिळेल का?
निवृत्तीनंतर तुमच्या हातात 5.12 कोटी रुपये मिळतील असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण जेव्हा NPS हे 60 वर्षांनंतर परिपक्व होते तेव्हा तुम्ही फक्त 60 टक्के रक्कम काढू शकता. याचा अर्थ 60 व्या वर्षी तुम्ही सुमारे 3 कोटी रुपये काढू शकाल. तर उर्वरित 2 कोटी रुपये तुम्हाला वार्षिक योजनेत गुंतवावे लागतील. या अॅन्युइटी योजनेमुळे तुम्हाला आयुष्यभर पैसे मिळत राहतील.
ही बातमी वाचा: