एक्स्प्लोर

SIP Investment : दर महिन्याला फक्त 10 हजार रुपये गुंतवा आणि करोडपती व्हा, कमी वेळेत कोट्यधीश करणारी ही स्किम आहे तरी काय?

How to become rich by investing in SIP : थोडी थोडी गुंतवणूक करून जर जास्त पैसे कमवायचे असतील तर एसआयपीमध्ये गुंवतणुकीचा पर्याय चांगला ठरू शकतो. 

How to become rich by investing in SIP : पैसा ही आजच्या काळातील सर्वात अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. त्यामुळे प्रत्येकालाच पैसा कमवायचा आहे, पण हे स्वप्न काहीजणांनाच सत्यात उतरवता येतं. श्रीमंत होणे हे अशक्य काम नाही. यासाठी तुम्हाला हुशारीने गुंतवणूक करावी लागेल. ज्या दिवशी तुमचा पैसा तुमच्यासाठी कमावायला लागतो, त्या दिवसापासून श्रीमंत होण्याचा मार्ग सोपा होतो. अशीच एक पद्धत आहे ज्यामध्ये थोडी थोडी गुंतवणूक करून कमी वेळात कोट्यधीश बनता येतं. 

SIP मध्ये गुंतवणूक म्हणजे काय?

शहाणपणाने गुंतवणूक करून कोणीही श्रीमंत होऊ शकतो. संपत्ती निर्माण करण्यासाठी शिस्त आणि संयमाने योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आजच्या काळात लोकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन, बाजारात अनेक गुंतवणुकीचे उपाय उपलब्ध आहेत आणि त्यापैकी एक SIP आहे. SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान. त्याच्या नावावरूनच स्पष्ट होते की पद्धतशीर गुंतवणूक करण्याची योजना.

AMC कंपन्या पर्याय देतात

SIP च्या माध्यमातून शेअर्समध्ये गुंतवणूक करता येते. तुम्ही कर्ज किंवा सोन्यासारख्या कमोडिटीमध्ये SIP देखील करू शकता. विविध मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या विविध प्रकारचे SIP पर्याय प्रदान करत आहेत. तुम्ही तुमचा आवडता पर्याय निवडू शकता आणि तुमची रिस्क घेण्याची क्षमता आणि परताव्याचा अंदाज याची आखणी करून SIP सुरू करू शकता.

17-18 वर्षात करोडपती होता येतं

एसआयपीवरील परतावा अनेक घटकांवर अवलंबून असतो. यामध्ये तुम्हाला आश्चर्यकारक परतावाही मिळू शकतो किंवा तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला नाममात्र परतावाही मिळू शकतो. याचं गणित समजावून घेण्यासाठी आपण 15 टक्क्याने परतावा गृहीत धरू. एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक 15 टक्के रिटर्नवर गुंतवली तर तुम्हाला खालील पद्धतीने रक्कम मिळेल.

  • 10 वर्षांत 27.86 लाख रुपये
  • 15 वर्षांत 67.68 लाख रुपये
  • 20 वर्षांत 1.52 कोटी रुपये.

त्यामुळे दर महिन्याला 10-10 हजार रुपये गुंतवून तुम्ही 17-18 वर्षांत करोडपती होऊ शकता.

20 हजार रुपये मासिक गुंतवणुकीवर परतावा

जर तुम्ही रक्कम दुप्पट केली आणि सरासरी व्याज 15 टक्के ठेवले तर तुम्ही फक्त 13-14 वर्षात करोडपती होऊ शकता. दरमहा 20-20 हजार रुपये गुंतवल्यास

  • 10 वर्षांत 55.73 लाख रुपये
  • 15 वर्षांत 1.36 कोटी रुपये
  • 20 वर्षांत 3.03 कोटी रुपये मिळू शकतात. 

यानंतर जर ही मुदत आणखी पाच वर्षांनी म्हणजे 25 वर्षे वाढवली तर एकूण रक्कम 6.5 कोटी रुपये होईल.

चक्रवाढ शक्तीचा परिणाम

SIP मधून या आश्चर्यकारक परताव्याचे रहस्य चक्रवाढीमध्ये आहे. चक्रवाढ म्हणजे चक्रवाढ व्याज. SIP द्वारे गुंतवणूक केल्याने तुमचे मुद्दल वाढतच जाते आणि परतावा त्यात जोडला जातो. 

Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की SIP मधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून, पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञाचा सल्ला घ्या. ABP माझा कधीही कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Mahapalika Akola : अकोला महापालिकेतील प्रमुख नागीर समस्या कोणत्या?Zero Hour Suresh Dhas VS Amol Mitkari : अमोल मिटकरींचे आरोप, सुरेश धसांचे थेट उत्तरZero Hour Mahapalika Chandrapur :अमृत योजनेच्या कामांचा परिणाम, विकासकामांमुळे चंद्रपुरची दुरवस्थाZero Hour Mahapalika Nashik : वाहनं वाढतायंत पण रस्ते तेवढेच, पुण्याच्या रांगेत नाशिकही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget