search
×

PM Vishwakarma Scheme : स्वत: चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकार देणार 3 लाख रुपयांचं कर्ज; या 18 क्षेत्रातील लोकांना संधी

PM Vishwakarma Scheme : पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी 3 लाख रुपयांचे कर्ज दिले जातं. यासोबतच अर्जदारांना कौशल्य सुधारण्यासाठी मास्टर ट्रेनरद्वारे प्रशिक्षण देखील दिलं जातं.

FOLLOW US: 
Share:

PM Vishwakarma Scheme Details : तुम्हाला तुमचा व्यवसाय (Business) सुरू करायचा असेल आणि आर्थिक मदत (Financial Help) मिळण्याची प्रतिक्षा असेल, तर सरकार (Government) तुम्हाला मदत करणार आहे. तुम्हाला स्वत: चा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळू शकते. केंद्र सरकारकडून पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Scheme) सुरु करण्यात आली असून ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या योजनेअंतर्गत सरकार कोणत्याही हमीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ठराविक 18 क्षेत्रांशी जोडलेलं असणं आवश्यक आहे.

आर्थिक सहाय्यासह कौशल्य प्रशिक्षण

पीएम विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत गरजूंना कर्ज दिले जाते आणि व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त ही योजना सुरू केली होती. यामध्ये विविध व्यवसायांशी निगडित लोकांना हमीशिवाय कर्ज दिले जाते. इतकंच नाही, तर त्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाचीही व्यवस्था सरकारद्वारेच करण्यात आली आहे. यासोबतच प्रशिक्षणावेळी स्टायपेंडसह इतर लाभ मिळण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

दोन टप्प्यात मिळणार कर्जाची रक्कम

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कोणत्याही कुशल व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि आर्थिक समस्यांमुळे अडचणी येत असतील तर तुम्ही या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता. यामध्ये सरकारद्वारे तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम दोन टप्प्यात दिली जाते. पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी त्याच्या विस्तारासाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. हे कर्ज अत्यंत सवलतीच्या 5 टक्के व्याजदराने दिली जाईल.

प्रशिक्षणासह दररोज 500 रुपये मोबदला

या योजनेत व्यवसाय उभारण्यासाठी 3 लाख रुपयांचे कर्ज देण्यासोबतच दुसरीकडे याअंतर्गत ठरलेल्या 18 ट्रेडमधील लोकांचे कौशल्य अधिक सुधारण्यासाठी सुमारे एक आठवड्याचे प्रशिक्षणही दिले जाते. मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाते आणि त्याशिवाय प्रतिदिन 500 रुपये स्टायपेंड देखील दिला जाईल. लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड, 15,000 रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जाईल.

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कर्ज मिळण्यासाठी पात्र उमेदवार

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती संबंधित 18 क्षेत्रांमधील असणे आवश्यक आहे. 18 क्षेत्रातील कामगारांना या योजनेद्वारे कर्ज मिळू शकते.

  • सुतार
  • बोट किंवा नाव बनवणारे
  • लोहार
  • टाळे बनवणारे कारागीर
  • सोनार
  • कुंभार
  • शिल्पकार
  • मेस्त्री
  • मच्छिमार
  • टूल किट निर्माता
  • दगड फोडणारे मजूर
  • मोची कारागीर
  • टोपली, चटई, झाडू बनवणारे
  • बाहुली आणि इतर पारंपारिक खेळणी उत्पादक
  • न्हावी
  • हार बनवणारे
  • धोबी
  • शिंपी

PM Vishwakarma Scheme : कर्ज मिळवण्यासाठीची पात्रता

  • अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
  • मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक पासबुक
  • वैध मोबाईल नंबर

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

  • अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.
  • मुख्यपृष्ठावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना हा पर्याय असेल.
  • येथे Apply Online पर्याय लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.
  • यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि योग्यरितीने भरा.
  • भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
  • आता फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा.

 

Published at : 01 Nov 2023 01:57 PM (IST) Tags: Personal Finance government PM business Scheme

आणखी महत्वाच्या बातम्या

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

टॉप न्यूज़

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?