(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Paytm : पेटीएम ट्रॅव्हल कार्निवलची घोषणा, विमान तिकिटावर 5,000 पर्यंत बचत तर बस-रेल्वे तिकिटावर 25 टक्के सूट
सणासुदीच्या निमित्ताने पेटीएम कार्निवलने प्रवास तिकिटांवर आकर्षक घोषणा केली आहे.फ्लाइट्सवर 5,000 रूपयांपर्यंतची बचत तर बस आणि रेल्वे तिकिटांवर 25 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.
Paytm Travel Carnival Sale : पेटीएम या भारतातील आघाडीच्या पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनीने गुरूवारी पेटीएम ट्रॅव्हल कार्निवलच्या लाँचची घोषणा केली. या ट्रॅव्हल कार्निवलदरम्यान ट्रॅव्हल बुकिंगवर विशेष फेस्टिव्ह सूट देण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत वापरकर्ते फ्लाइट्सवर जवळपास 5,000 रूपयांची बचत करू शकतात आणि बस बुकिंग्जवर 25 टक्के सूट म्हणजेच जवळपास 500 रूपये बचतीचा आनंद घेऊ शकतात.
कंपनीने वापरकर्त्यांना अतिरिक्त बचत देण्यासाठी आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, बँक ऑफ बडोदा आणि एयू स्मॉल फायनान्स बँक अशा आघाडीच्या बँकांसोबत सहयोग केला आहे. प्रवासी देशांतर्गत फ्लाइट्सवर जवळपास 15 टक्के सूट आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर जवळपास 10 टक्के सूटचा लाभ घेण्यासाठी प्रोमो कोड्सचा वापर करू शकतात, जसे आयसीआयसीआय बँकेसाठी 'आयसीआयसीआयसीसी', आरबीएल बँकेसाठी 'फ्लायआरबीएल', बँक ऑफ बडोदासाठी "बॉबसेल" व एयू स्मॉल फायनान्स बँकेसाठी 'एयूसेल.
तसेच, पेटीएमची तिकिट अशुअर सेवा कन्फर्म रेल्वे तिकिटांची खात्री देते, तर बुकिंग्ज यूपीआयच्या माध्यमातून विनाशुल्क दिल्या जातात. वापरकर्ते रेल्वे तिकिटांसाठी फक्त ४९ रूपयांपासून मोफत कॅन्सलेशनचा देखील अवलंब करू शकतात.
पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले, "सणासुदीचा काळ जवळ आला असताना आणि देशभरातील लोक त्यांच्या मूळगावी किवा सुट्टीतील धमालीसाठी प्रवासाचे नियोजन करत असताना आम्हाला विशेष ऑफर्स सादर करण्याचा आनंद होत आहे, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक किफायतशीर व सुखकर होईल. आघाडीच्या बँकांसोबत सहयोगासह आमचा फ्लाइट्स, रेल्वे व बसेसवर बचत देण्याचा मनसुबा आहे, ज्यामधून लाखो पेटीएम वापरकर्ते विनासायास प्रवासाचा आनंद घेऊ शकतील."
ही बातमी वाचा: