एक्स्प्लोर

दिलासादायक! Paytm अॅप, क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स, कार्ड मशिन्‍स 15 मार्चनंतरही कार्यरत राहणार, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

पेटीएम (Paytm) वापरकर्त्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेटीएम अॅप (Paytm app), क्‍यूआर (QR), साऊंडबॉक्‍स (soundbox), कार्ड मशिन्‍स 15 मार्चनंतर देखील कार्यरत राहणार आहेत.

Paytm Payments Bank : पेटीएम (Paytm) वापरकर्त्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेटीएम अॅप (Paytm app), क्‍यूआर (QR), साऊंडबॉक्‍स (soundbox), कार्ड मशिन्‍स 15 मार्चनंतर देखील कार्यरत राहणार आहेत. आम्‍ही आघाडीच्‍या संस्‍थांसोबत सहयोगाने आमचे आर्थिक सेवा वितरण व्‍यासपीठ विस्‍तारित असल्याची माहिती पेटीएमच्या प्रवक्‍त्याने दिली आहे. देशभरातील पेटीएम वापरकर्त्‍यांसाठी सर्वसमावेशक नेक्‍स्‍ट-जनरेशन आर्थिक इकोसिस्‍टम निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.  

Paytm ही भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा देणारी कंपनी आहे. वापकरर्त्‍यांना आणि मर्चंट्सना एकसंधी पेमेंट अनुभव देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. नुकत्याच करण्‍यात आलेल्‍या एका घोषणेमुळं वापरकर्त्‍यांच्‍या मनात पेटीएम अॅपच्‍या कार्यक्षमतेबाबत प्रश्‍नं निर्माण झाले असतील. पण वापरकर्ते व मर्चंट्सनी लक्षात घ्‍यावे की पेटीएम अॅप कार्यरत आहे. 15 मार्च 2024 नंतर देखील ते कार्यरत राहिल, अशी माहिती पेटीएमच्या प्रवक्‍त्याने दिली आहे. 

पेटीएम अॅप संदर्भातील तुमच्या मनात नेमके काय प्रश्न? 

1) पेटीएम अॅप आणि त्‍यांच्‍या सेवा 15 मार्चनंतर देखील कार्यरत राहतील का?

होय, वापरकर्ते कोणत्‍याही व्‍यत्‍ययाशिवाय पेटीएम अॅपवरील सेवा वापरणे सुरू ठेवू शकतात. 

2) पेटीएम क्‍यूआर कोड, साऊंडबॉक्‍स, कार्ड मशिन्‍स विनासायास कार्यरत राहतील का?

होय, पेटीएम क्‍यूआर कोड्स, साऊंडबॉक्‍स आणि कार्ड मशिन्‍स पूर्णपणे कार्यरत राहतील. यामधून दैनंदिन व्‍यवहारांसाठी या सेवांवर अवलंबून असलेल्‍या लाखो वापरकर्त्‍यांना व मर्चंट्सना सातत्‍यपूर्ण सोयीसुविधेची खात्री मिळते. 

3) मी पेटीएम अॅपवर इतर सर्व सेवा जसे चित्रपट, इव्‍हेण्‍ट्स, प्रवास (मेट्रो, फ्लाइट, ट्रेन, बस) तिकिटे बुकिंग्‍ज यांचा लाभ घेणे सुरू ठेवू शकतो का?

पेटीएम अॅपवरील इतर सर्व सेवा जसे चित्रपट, इव्‍हेण्‍ट्स, प्रवास (मेट्रो, फ्लाइट, ट्रेन, बस) तिकिटे बुकिंग्‍ज पूर्णपणे कार्यरत राहतील. 

4) मी पेटीएम अॅपवर मोबाइल/इंटरनेट रिचार्ज करणे, युटिलिटी बिल भरणे आणि इतर सेवा सुरू ठेवू शकतो का?

वापरकर्ते पेटीएम अॅपच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे मोबाइल फोन, डीटीएच किंवा ओटीटी सबस्क्रिप्‍शन्‍स रिचार्ज करणे आणि सर्व युटिलिटी बिल भरणे (वीज, पाणी, गॅस, इंटरनेट) सुरू ठेवू शकतात. 

5) मी पेटीएम डिल्सवर रेस्‍टॉरंट ऑफर्सचा फायदा घेणे सुरू ठेवू शकतो का?

होय, पेटीएम डिल्‍स 15 मार्चनंतर देखील पूर्वीप्रमाणे कार्यरत राहतील. वापरकर्ते कोणत्‍याही व्‍यत्‍ययाशिवाय सर्व ऑफर्स व सूटचा आनंद घेणे सुरू ठेवू शकतात.

6) मी पेटीएम अॅपवर सिलिंडर बुक करण्‍यासह माझे पाइप्‍ड गॅस बिल भरू शकतो का, तसेच पेटीएम अॅपवर अपार्टमेंटचे वीजेचे बिल भरू शकतो का?

होय, तुम्‍ही ही सेवा वापरणे सुरू ठेवू शकता.

7) मी पेटीएम अॅपचा वापर करत विमा खरेदी करण्‍यासह विम्‍याचा प्रीमियम भरू शकतो का?

होय, वापरकर्ते पेटीएम अॅपचा वापर करत बाइक, कार, आरोग्‍य अशा बाबींसाठी नवीन विमा पॉलिसी खरेदी करू शकतात, तसेच प्रीमियम्‍स भरू शकतात. 

8) मी पेटीएम अॅपचा फास्‍टटॅग खरेदी करू शकतो का, तसेच माझ्या इतर बँकांचे फास्‍टटॅग रिचार्ज करू शकतो का?

होय, आम्‍ही पेटीएम अॅपवर एचडीएफसी बँक फास्‍टटॅग्‍स ऑफर करत आहोत, तसेच इतर सहयोगी बँकांचे फास्‍टटॅग रिचार्ज सेवा देखील देत आहोत. पण, तुम्‍ही पेटीएम पेमेंट्स बँक फास्‍टटॅग्‍स खरेदी करू शकत नाही, तरीही ते १५ मार्चपूर्वी खरेदी करू शकता आणि शिल्‍लक संपेपर्यंत वापरू शकता. 

9) इक्विटी, म्‍युच्‍युअल फंड्स आणि एनपीएसमधील माझ्या गुंतवणूका सुरक्षित आहेत का?

होय, पेटीएम मनीसह ग्राहकांच्‍या इक्विटी, म्युच्‍युअल फंड्स किंवा एनपीएसमधील गुंतवणूका कार्यरत आहेत. पेटीएम मनी लिमिटेड सेबी-नियामक आणि पूर्णत: अनुपालन करणारी आहे.

10) मी पेटीएम अॅपवर सोने खरेदी-विक्री करणे सुरू ठेवू शकतो का?

होय, तुम्‍ही अॅपवर डिजिटल गोल्‍डची खरेदी-विक्री सुरू ठेवू शकता. तसेच, तुमचे पेटीएम गोल्‍ड इन्‍व्‍हेस्‍टमेंट्स कार्यरत आहेत आणि एमएमटीसी-पीएएमपीसह सुरक्षित आहेत.   

11) मी पेटीएम अॅपवर माझे क्रेडिट कार्ड बिल भरू शकतो का?

होय, तुम्‍ही हे बिल भरणे सुरू ठेवू शकता. 

12) 12. पेटीएमवरील यूपीआय सेवा 15 मार्चनंतर देखील सुरू राहिल का?

होय, पेटीएम अॅपवरील यूपीआय सेवा कार्यरत राहतील, जेथे कंपनीला 14 मार्च 2024 रोजी मल्‍टी-बँक मोडलअंतर्गत थर्ड पार्टी अॅप प्रोव्‍हायडर (टीपीएपी) म्‍हणून यूपीआयमध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) कडून मान्‍यता मिळाली आहे. यामधून पेटीएम वापरकर्त्‍यांना विनाव्‍यत्‍यय युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सेवांची खात्री मिळते. पेमेंट्ससाठी पेटीएमचा वापर करणा-या मर्चंट्ससाठी त्‍यांच्‍या ग्राहकांना सुलभ व सोपा पेमेंट अनुभव मिळेल.

13) मी पेटीएमवर यूपीआय ऑटोपेचा वापर करू शकतो का?

होय, पेटीएम अॅपवरील यूपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) ऑटो पे वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांसाठी विनासायास कार्यरत राहील.

14) कोणतीही अडचण न येता माझे पैसे सेटल होतील का?

तुमच्‍या विद्यमान पेटीएम पेमेंट्स बँक लि. खात्‍यामधील सेटलमेंट 15 मार्च 2024 पर्यंत कोणत्‍याही समस्‍येशिवाय कार्यरत राहिल. खात्‍यामधील शिल्‍लक 15 मार्च 2024 नंतर देखील काढता येऊ शकते. 
पण, आम्‍ही शिफारस करतो की एकसंधी सेटलमेंट्ससाठी इतर बँकांमध्‍ये असलेल्‍या तुमच्‍या इतर कोणत्‍याही बचत किंवा चालू खात्‍यांकरिता पेटीएम पेमेंट्स बँक लि. मधील बिझनेस अॅपसाठी पेटीएममधील तुमचे सेटलमेंट खाते बदला.

15) मर्चंट्स पीपीबीवरून इतर बँकेमध्‍ये त्‍यांचे सेटलमेंट बँक खाते कशाप्रकारे बदलू शकतात?

मर्चंट्स बिझनेस प्रोफाइलच्‍या माध्‍यमातून किंवा मेन्‍यूच्‍या डाव्‍या बाजूस असलेल्‍या सेटलमेंट सेटिंग्ज पर्यायाच्‍या माध्‍यमातून 'चेंज सेटलमेंट अकाऊंट' पेज उघडत सेटलमेंट खाते बदलू शकतात. त्‍यानंतर सेटलमेंट अकाऊंटवरील चेंज बटनवर क्लिक करा. शेवटची पायरी म्‍हणजे विद्यमान खाते निवडून सेव्‍हवर क्लिक करा आणि ओटीपी प्रविष्‍ट करा किंवा अॅड ए न्‍यू बँक अकाऊंट ऑप्‍शन निवडा आणि त्‍यानंतर आवश्‍यक माहिती भरा.

महत्वाच्या बातम्या:

Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेत खातं असेल तर लक्ष द्या, 15 मार्चपूर्वी 'हे' काम करा अन्यथा तुमचा पगार अडकेल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Embed widget