पाकिस्तानचे चलन बदलणार? आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानात नेमकं चाललंय काय?
आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान इतर देशांकडे मदतची मागणी देखील करताना दिसत आहे. अशा स्थितीत सध्या पाकिस्तानात वेगळीच चर्चा सुरु आहे. पाकिस्तानचे चलन बदलण्याच्या संदर्भाच चर्चा सुरु आहे.
Pakistan Currency: आपल्या शेजारी असलेला पाकिस्तान (Pakistan) देश सध्या मोठ्या आर्थिक संकटात (financial crisis) आहे. महागाईत (Inflation) मोठी वाढ झालीय. या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान इतर देशांकडे मदतची मागणी देखील करताना दिसत आहे. दरम्यान, अशा स्थितीत सध्या पाकिस्तानात वेगळीच चर्चा सुरु आहे. पाकिस्तानचे चलन बदलण्याच्या संदर्भाच चर्चा सुरु आहे. पाकिस्ताच्या रुपयावर एका नेत्याचे चित्र छापण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळं पाकिस्तानी चलन बदलणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे.
पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत बिकट
सध्या पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मोठ्या आर्थिक समस्येचा सामना पाकिस्तानला करावा लागतो. एकीकडे पाकिस्तान इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) सोबत मदतीसाठी चर्चेची तयारी करत आहे. अशात दुसरीकडे, पाकिस्तानचे प्रमुख राजकीय पक्ष पाकिस्तानी चलन म्हणजेच पाकिस्तानी रुपयावरील चित्र बदलण्याची मागणी करत आहेत. पाकिस्तानची आर्थिक स्थिती बदलण्यासाठी खासगीकरण आवश्यक असल्याची माहिती पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी दिली आहे. त्यामुळं पाकिस्तानात सध्या उलट सुलट चर्चा सुरु आहेत.
पाकिस्तानच्या चलनी नोटांवर झुल्फिकार अली भुट्टो यांचे चित्र लावण्याची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या चलनी नोटांवर झुल्फिकार अली भुट्टो यांचे चित्र लावण्याची मागणी पाकिस्तान पीपल्स पार्टीने , ) केली आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टी हा पाकिस्तानातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. या पक्षाकडून चलनी नोटांवर झुल्फिकार अली भुट्टो यांचे चित्र लावण्याची मागणी जोर धरत आहे. पीपीपीने पक्षाचे संस्थापक झुल्फिकार अली भुट्टो यांना राष्ट्रीय लोकशाही नायक म्हणून घोषित करण्याची मागणी करणारा ठराव पाकिस्तान सरकारकडे मंजूर केला आहे. त्यामुळं आता पाकिस्तान पीपल्स पार्टीने केलेली मागणी मंजूर होणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
भुट्टो यांना निशाण-ए-पाकिस्तान देण्यात यावे
पाकिस्तान पीपल्स पार्टीने झुल्फिकार अली भुट्टो यांना निशाण-ए-पाकिस्तान देण्यात यावे अशीही मागणी केली. याबाबतचा ठराव देखील पक्षाने मंजुर केलाय. तसेच भुट्टो यांना कायद-ए-आवाम" (जनतेचा नेता) ही पदवी देण्याची मागणी केलीय. तसेच पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-पाकिस्तान देण्यासंदर्भात प्रस्ताव देखील पाकिस्तानच्या सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळं सरकार यावर काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भुट्टो यांच्या सन्मानार्थ एक स्मारक बांधण्याची मागणी
पाकिस्तानच्या चलनी नोटांवर भुट्टोचे चित्र लावण्याची मागणी करण्याव्यतिरिक्त, या ठरावात भुट्टो यांच्या सन्मानार्थ एक योग्य स्मारक बांधण्याची, तसेच त्यांची समाधी राष्ट्रीय तीर्थक्षेत्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
कांदा निर्यात मुल्यावरुन भारत-पाकिस्तानमध्ये चढाओढ, पाकिस्ताननं घेतला मोठा निर्णय