Stock Market : शेअर मार्केटमध्ये चढ-उतार, पण दीर्घ काळ गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा, काय सांगतात गुंतवणूक सल्लागार?
Stock Market : दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी संभ्रमावस्थेत राहण्याची गरज नाही, अशी माहिती गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या 'पैसा झाला मोठा' या कार्यक्रमात निखिल नाईक बोलत होते.
![Stock Market : शेअर मार्केटमध्ये चढ-उतार, पण दीर्घ काळ गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा, काय सांगतात गुंतवणूक सल्लागार? paisa jhala motha abp majha special episode Investment advisor nikhil naik information on currant secretion of sheer market Stock Market : शेअर मार्केटमध्ये चढ-उतार, पण दीर्घ काळ गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा, काय सांगतात गुंतवणूक सल्लागार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/20/7a0808c96a9180ab1e706935f8449ac4_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Stock Market : "शेअर मार्केटमध्ये चढ-उतार होत असले तरी गेल्या काही दिवसांपासून दिलासादायक काही गोष्टी घडत आहेत. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे निर्यात वाढत आहे. व्याजदर स्थिर आहेत. घरांची मागणी वाढत आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी संभ्रमावस्थेत राहण्याची गरज नाही, अशी माहिती गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या 'पैसा झाला मोठा' या कार्यक्रमात निखिल नाईक बोलत होते.
केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून आजपर्यंत शेअर बाजारात चढ-उतार होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करायची की नाही? या संभ्रमावस्थेत आहेत. याच विषयावर एबीपी माझाच्या 'पैसा झाला मोठा' या कार्यक्रमात निखिल नाईक यांनी गुंतवणूकदारांसाठी महत्वाची माहिती सांगितली आहे.
"गेल्या तीन वर्षांपासून जागतिक बाजार पेठेत शेअर मार्केटमध्ये चढ-उतार होत आहेत. तर गेल्या वीस दिवसांपासून भारतीय शेअर मार्केटमध्येही चढ-उतार होत आहेत. असे असले तरी ऑक्टोबर 2021 पासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत चांगली विक्री केलेली आहे. याबरोबरच कोरोना नंतरची परिस्थिती आता पूर्ववत होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून निर्यातीमध्येही चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे व्याजदरात वाढ केलेली नाही. यामुळेच घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. या गोष्टी दिलासादायक आहेत. त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी संभ्रमावस्थेत राण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती निखिल नाईक यांनी दिली.
"जागतिक बाजारपेठेतील परिस्थितीचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होत असतो. त्यातच सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये तणावाचे वातवरण आहे. यामुळेच शेअर बाजारात चढ-उतार होत आहेत, अशी गुंतवणूकदारांची भावना आहे. परंतु, युद्धाचा शेअर बाजारावर जास्त परिणाम होत नसतो, तो काही काळासाठी असतो अशी माहिती निखिल गोखले यांनी दिली आहे. ते म्हणाले, "युद्ध ही गोष्ट काही काळासाठी असते. त्यामुळे त्याचा शेअर बाजारावरही काही काळासाठीच परिणाम होत असतो. दोन्ही देशांमध्ये युद्ध झालेच तर फार कमी काळासाठी त्याचा शेअर मार्केटवर परिणाम होईल. अलिकडील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव आहे. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत."
युएसएमधील महागाईचा मार्केटवर परिणाम
"सध्या युएसएमधील महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. युएसए ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सध्या युएसएमध्ये गेल्या 40 वर्षांपेक्षा जास्त महाईचा दर वाढला आहे. वाढत्या महागाईमुळे युएसएमध्ये व्याजदर वाढवू असे सांगितले जात आहे. वाढत्या महागाईमुळं व्याजदर वाढणं हे स्वाभाविक होतं. युएसएने व्याजदर वाढवले तर आपल्याकडंही व्याज दर वाढतील अशी शक्यता होती. परंतु, आपल्याकडील सध्याची परिस्थीती पाहून रेपो दरात बदल करण्यात आला नाही. भारतातही महागाई वाढत राहिली तर आपल्याकडेही व्याजदरात बदल होऊ शकतात. त्यामुळे त्याचा परिणाण भारतावरही होऊ शकतो. असे असले तरी भारतात रेपो दरात कोणताही बदल करण्याता आलेला नाही. रेपो जर जैसे थे ठेवल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु, जागतिक बाजर पेठेतील वाढत्या महागाईचा शेअर बाजारावर परिणाम होतो, अशी माहिती निखिल नाईक यांनी यावेळी दिली.
पाहा संपूर्ण मुलाखत!
महत्वाच्या बातम्या
- नव्या वर्षाची सुरुवात करताना गुंतवणुकीचा आढवा, काय पूर्वतयारी कराल!
- Currency News : तुमच्याकडे असलेली 100 रुपयांची नोट ठरेल 'लाख'मोलाची; होईल मोठा फायदा, जाणून घ्या
- Online Fraud : फक्त एक कोड अन् बँक खातं पूर्ण रिकामं; SBI चा इशारा, वाचा पूर्ण अहवाल
- LIC कडे 21 हजार कोटी बेवारस; विमा रक्कमेवर दावा न केलेल्या रक्कमेत वाढ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)