एक्स्प्लोर

LIC चे 21 हजार कोटी बेवारस; विमा रक्कमेवर दावा न केलेल्या रक्कमेत वाढ

LIC IPO: एलआयसीकडे ग्राहकांचे 21 हजार 500 कोटी रुपये पडून असल्याचे समोर आले आहे. या रक्कमेवर ग्राहकांनी, त्यांच्या वारसदारांनी दावा केला नाही.

Life Insurance Corporation: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या विमा पॉलिसीच्या विक्रीत घट झाली असल्याचे समोर आले आहे. एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार, वैयक्तिक आणि समूह विमा पॉलिसीच्या विक्रीत घट झाली आहे. वर्ष 2018-19 मध्ये 7.5 कोटी पॉलिसींची विक्री करण्यात आली होती. तर, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 15.84 टक्के घट झाली. या आर्थिक वर्षात 5.25 कोटी पॉलिसीची विक्री करण्यात आली. त्याशिवाय एलआयसीकडे तब्बल 21 हजार कोटींची रक्कम बेवारसपणे पडून आहे. 

लॉकडाऊनमध्ये 22.66 टक्के घट

कंपनीने सांगितले की,  कोरोना महासाथीमुळे आणि महासाथीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे, वैयक्तिक पॉलिसींची विक्री 2019-20 च्या चौथ्या तिमाहीत 22.66 टक्क्यांनी घसरून 63.5 लाख झाली आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत ही संख्या 82.1 लाख होती. त्याचा प्रभाव 2020-21 आणि 2021-22 च्या पहिल्या तिमाहीतही दिसून आला. या कालावधीत ते अनुक्रमे 46.20 टक्क्यांनी 19.1 लाख आणि नंतर 34.93 टक्क्यांनी घटून 23.1 लाखांवर आले. 

एलआयसीकडे 21,539 कोटी 'बेवारस' अवस्थेत

एलआयसीकडे सप्टेंबर 2021 पर्यंत 21,539 कोटी रुपये पडून आहेत. या निधीवर कोणीही दावा केलेला नाही. LIC ने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे सादर केलेल्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरच्या (IPO) दस्तऐवजातून ही माहिती प्राप्त झाली आहे. या रक्कमेत दावा न केलेल्या रक्कमेवरील व्याजाचाही समावेश आहे. मार्च 2021 पर्यंत दावा न केलेली रक्कम 18,495 कोटी रुपये आणि मार्च 2020 अखेरीस 16,052.65 कोटी रुपये होता. त्याच वेळी, मार्च 2019 अखेरपर्यंत ही रक्कम 13,843.70 कोटी रुपये होती.

महिनाभरात एलआयसीचा आयपीओ

एलआयसीनं आयपीओ बाजारात आणण्यासाठी सेबीकडे अर्ज केला आहे. त्यामुळे आता एलआयसीचा आयपीओ महिन्याभरात येणार हे निश्चित झालं आहे. एलआयसीचा आयपीओ हा जवळपास 65 ते 75 हजार कोटींचा असू शकतो. सरकार एलआयसीतील 5 टक्के समभाग म्हणजेच शेअर विकणार आहेत. आणि यातून 65 ते 75 हजार कोटी उभारण्याचा मानस सरकारचा आहे. आतापर्यंत सर्वाधित मोठा आयपीओ हा नुकतीच लिस्टिंग झालेली पेटीएम कंपनी आहे. पेटीएम कंपनीचा आयपीओ हा 18 हजार 500 कोटी रुपयांचा होता. त्यामुळे एलआयसीच्या आयपीओला फादर ऑफ ऑल आयपीओ म्हटलं जातं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Embed widget