नव्या वर्षाची सुरुवात करताना गुंतवणुकीचा आढवा, काय पूर्वतयारी कराल!
गुंतवणुक करत असताना योग्य ती पूर्वतयारी करणे गरजेचं असते. त्यातच मागील दोन वर्षांत आपला वैद्यकीय खर्च आणि इतर खर्चही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणुक करताना अनेक गोष्टी पडताळून पाहाव्या लागतील. यासाठी चेकलिस्ट करणं गरजेचं आहे.
Emergency Fund : भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आपण गुंतवणुक करत असतो. पण ही गुंतवणुक करत असताना योग्य ती पूर्वतयारी करणे गरजेचं असते. त्यातच मागील दोन वर्षांत आपला वैद्यकीय खर्च आणि इतर खर्चही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणुक करताना अनेक गोष्टी पडताळून पाहाव्या लागतील. यासाठी चेकलिस्ट करणं गरजेचं आहे. आपण करत असलेल्या गुंतवणुकीतून परतावा किती मिळतो? मेडिकल आणि लाईफ इन्शुरन्सची याची सांगड व्यवस्थित घालली आहे का? किंवा कशी घालावी? यासारखे अनेक प्रश्न तुमच्यासमोर असतील. त्यामुळेच नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आपण गुंतवणुकीची खबरबात कशी घ्यायची याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. एबीपी माझाच्या 'पैसा झाला मोठा' या कार्यक्रमात गुंतवणुक सल्लागार निखिल नाईक यांनी गुंतवणुकीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
गुंतवणुक करताना पूर्वतयारी काय करावी?
तुमचं वार्षिक उत्पन्न (NetWorth) किती आहे? याचा आढावा घ्या.
तुमच्या मासिक, वार्षिक जमाखर्चाचा ताळेबंद पाहा.
इमर्जन्सी फंड किती आहे, त्याचाही आढावा घ्या.
लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेअम याची योग्य सांगड घाला.
पुढच्या तीन ते पाच वर्षातील महत्वाच्या खर्चाचा अंदाज घ्या.
एखाद्या कागदावर एकूण मालमत्तेबाबत लिहा. त्यात तुमची स्थावर मालमत्ता किती आहे? म्युचल फंड किती आहेत? पीपीएफमध्ये गुंतवणुक किती आहे? बँक डिपॉझिट किती आहे? घरात रोख रक्कम असेल तर ती किती आहे? तुमच्यावर कर्ज असेल त्याची नोंदही करणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्षाचं उत्पन्न किती आहे? याची नोंदही करणं गरजेचं आहे. त्यामध्ये एका बाजूला तुमचा पगार, व्यावसाय करत असाल तर मिळणारं उत्पन्न लिहणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला तुमचा मासिक खर्च किती होतो हे लिहावा. मोबाईल बिलापासून सर्व घरखर्चापर्यंतची नोंद यामध्ये करावी. दोन वर्षांपासूनची स्थिती पाहाता मेडिकल इमर्जन्सीसाठीही हेल्थ इन्शुरन्स अथवा काही पैसे बाजूला काढून ठेवण्याची गरज आहे. कारण पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. वर्षाच्या सुरुवातीला रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे वर्षभरासाठी हेल्थ इन्शुरन्सही महत्वाचा ठरु शकतो. त्यासाठी आपण ज्या शहरात राहात आहात, तेथील मेडिकल खर्च किती येऊ शकतो? त्यानुसार पैसे बचत करावे अथवा हेल्थ इन्शुरन्स घ्यावा. दोन वर्षातील परिस्थिती पाहाता, तुमचा नऊ महिन्याचा होणारा मासिक खर्च बचत म्हणून बाजूला काढून ठेवणं गरजेचं आहे.
लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेअम याची योग्य सांगड घालाल?
एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये असेल? तर त्या व्यक्तीने एक कोटी रुपयांचा इन्शुरन्स घ्यावा. तर तुम्ही राहात असलेल्या शहरानुसार मेडिक्लेअप खरेदी करावा. कमीत कमी दहा लाख रुपयांचा मेडिक्लेअम असणे गरजेचं आहे.
गुंतवणुक करताना अंमलबजावणी कशी करावी?
आपण कुठली विमा पॉलिसी निवडणार आहोत ते ठरवणे
आपण कुठे गुंतवणुक करणार तेही निश्चित करणे
आपलं मृत्यूपत्र झालंय का? त्याचा आढावा घेणे
गुंतवणुकीचा मासिक आढावा आपण घेतोय ना, याकडे लक्ष देणे
कुठे गुंतवणुक करायची नाही, हे ठरवणं
आपला एकूण खर्चाची माहिती काढून विमा पॉलिसी घ्यावी. जेणेकरुन कुटुंब सुरक्षित राहिल. आपल्यावर कर्चाचं इन्शुरन्स घ्यावं. मुलाचं शिक्षण आणि इतर गोष्टींचा अभ्यास करुन इन्शुरन्स घ्यावे. शक्यतो टर्म इन्शुरन्स निवडा. पुढील तीन ते पाच वर्ष कालावधीत लागणारा खर्च काढून ठेवा. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणुक करा. तसेच गुंतवणुक परताव्याप्रमाणे होणारं नुकसान टाळणेही महत्वाचं असते. त्यामुळे कुठे गुंतवणुक करु नये आणि कुठे गुंतवणुक करावी. याचाही अभ्यास करा.
पाहा संपुर्ण मुलाखत :