(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion Price : कांद्याची घोडदौड, बळीराजाला दिलासा! सरकारकडून दर कमी करण्याचे प्रयत्न सुरुच, मात्र...
कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याचा दर हा 80 रुपये किलोवर पोहोचला आहे.
Onion Price in India: सध्या कांदा (Onion) उत्पादकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याचा दर हा 80 रुपये किलोवर पोहोचला आहे. तर सरासरी कांद्याचा दर हा 50 रुपये किलोच्या आसपास आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्याकंडे (Farmers) सध्या कांदा आहे, त्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे. दरम्यान, ग्राहकांच्या खिशाला ज्यादाचा फटका बसून नये म्हणून सरकारनं उपाययोजना करुन देखील कांद्याचे दर वाढत आहेत.
सरकारनं उपायोजना करुनही कांद्याचे दर वाढत आहेत. अनेक शहरात सरकारनं कमी दरात कांद्याची विक्री सुरु केली आहे. मात्र, तरीही कांद्याचे दरात घसरण होत नाही. सरकारने सवलतीच्या दरात कांदा विकण्यास गेल्या अनेक दिवसापासून सुरुवात केली आहे. तरीदेखील किरकोळ बाजारात कांद्याचा दर हा 80 रुपये किलोवर कायम आहे.
सध्या बाजारात काय स्थिती?
किरकोळ बाजारात कांद्याची कमाल किंमत 80 रुपये प्रति किलो आहे, तर काही ठिकाणी कांदा 27 रुपयांपर्यंत स्वस्त दराने विकला जात आहे. काल 10 सप्टेंबर रोजी देशभरात कांद्याची सरासरी किरकोळ किंमत (ऑल इंडिया ॲव्हरेज प्राइस) 49.98 रुपये प्रति किलो होती.
5 सप्टेंबरपासून दिल्ली-मुंबईत कमी दरात कांदा विक्री सुरु होणार
चढ्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने आठवडाभरापूर्वी सवलतीच्या दरात कांद्याची विक्री सुरू केली आहे. याअंतर्गत 35 रुपये किलो या सवलतीच्या दरात कांदा लोकांना उपलब्ध करून दिला जात आहे. सरकारने हा उपक्रम 5 सप्टेंबरपासून सुरू केला. सध्या दिल्ली-एनसीआर आणि मुंबईतील लोकांना सवलतीच्या दरात सरकारी कांद्याचा लाभ मिळत आहे.
सहकारी संस्थांकडे कांद्याचा किती साठा?
सरकारी सहकारी संस्था एनसीसीएफ आणि नाफेडकडून स्वस्त दरात कांदा विकला जात आहे. दोन्ही सहकारी संस्था त्यांच्या बफर स्टॉकमधून मोबाईल व्हॅनद्वारे कांद्याची विक्री करत आहेत. सहकारी संस्थांकडे सध्या 4.7 लाख टन कांद्याचा सुरक्षित साठा आहे. सहकारी संस्थांनी सवलतीच्या दरात विक्री केल्यास कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यास मदत होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.
देशभरात कांदा स्वस्त दरात उपलब्ध होणार
केंद्रीय अन्न वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या आठवड्यात मोहिमेचा शुभारंभ करताना सांगितले होते की, पहिल्या टप्प्यात दिल्ली-एनसीआर आणि मुंबईतील लोकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून दिला जात आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यांच्या राजधान्यांमध्ये ते सुरू करण्यात येणार आहे. या आठवड्यापासून दुसरा टप्पा सुरू होणार आहे. कोलकाता, गुवाहाटी, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, अहमदाबाद, रायपूर ही शहरे दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट केली जातील. तिसऱ्या टप्प्यात देशभरात कांदा स्वस्त दरात विकला जाणार आहे. तिसरा टप्पा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल.
महत्वाच्या बातम्या: