एक्स्प्लोर

मोठी बातमी! कांद्याचे दर वाढल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, 35 रुपये किलो दरानं विकणार कांदा

कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi NCR)  सरकार आता 35 रुपये किलो दराने कांद्याची विक्री करणार आहे

Onion News : सध्या बाजारात कांद्याचे दर (Onion Rate) वाढत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जवळ कांदा आहे, त्या शेतकऱ्यांना (Farmers) याचा चांगला फायदा होत आहे. मात्र, एका बाजूला कांद्याचे दर वाढत असताना सरकारनं दुसरा बाजूला मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi NCR)  सरकार आता 35 रुपये किलो दराने कांद्याची विक्री करणार आहे. वाढत्या दरातून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. 

दिल्ली आणि लगतच्या शहरात कांदा 60 रुपये किलोवर

दिल्ली-एनसीआरमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या ठिकाणच्या दिलासा देण्यासाठी सरकारनं कमी दरात कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं तेथील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय राजधानी आणि लगतच्या शहरांमध्ये कांद्याचा भाव 60 रुपये किलोवर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने स्वत:हून सवलतीच्या दरात कांदा विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार आता या भागात 35 रुपये किलोने कांदा विकणार आहे. बाजारातील भाव मोडीत काढणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

आजपासून दिल्ली-एनसीआरमध्ये कांद्याची विक्री सुरु

दरम्यान, सरकार आजपासून दिल्ली-एनसीआरमध्ये कांद्याची विक्री सुरू करणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने यासाठी नाफेड आणि एनसीसीएफला आदेश दिले आहेत. हे दोन्ही सरकारी युनिट 35 रुपये किलो दराने सर्वसामान्यांना कांदा उपलब्ध करून देणार आहेत.

नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची विक्री 

नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही सरकारी संस्था सरकारच्या वतीने सर्वसामान्यांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे काम करतात. या संस्था मध्यवर्ती दुकाने, मोबाईल व्हॅन आणि इतर माध्यमातून सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. गतवर्षी देशभरात कांद्याचे तसेच टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले असताना सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून लोकांना स्वस्त दरात टोमॅटो आणि कांदे उपलब्ध करून दिले होते.

डाळीसह तांदळाची देखील स्वस्त दरात विक्री

सर्वसामान्य जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार विविध निर्णय घेत आहे. सध्या सरकार स्वस्त दरात पीठ, डाळ, तांदूळ विकत आहे. गेल्या वर्षीच सरकारने पीठ, डाळी आणि तांदूळ ‘भारत’ या ब्रँड नावाने बाजारात आणले होते. 

महत्वाच्या बातम्या:

Onion Market : शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचा प्रकार! 'बफर स्टॉक'चा कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली, शेतकरी संघटनांचा तीव्र विरोध

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget