एक्स्प्लोर

OLA : ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? 

OLA CEO : ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल मोठ्या अडचणीत सापडले आहेत.  त्यांच्या विरोधात एफआयर दाखल करण्यात आला आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात. 

बंगळुरु : बंगळुरु पोलिसांनी ओलाचे संस्थापक आणि सीईओ (OLA CEO) भाविश अग्रवाल (Bhavish Aggrawal) आणि वरिष्ठ कार्यकारी सुब्रत कुमार दास यांच्या विरुद्ध आत्महत्येला प्रोत्साहन दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.  ओलाच्या एका कर्मचाऱ्यानं कथितपणे सप्टेंबर महिन्यात कामाच्या दबावामुळं जीवन संपवलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार 38 वर्षांच्या के. अरविंद या व्यक्तीं 28 पानांची नोट जीवन संपवण्यापूर्वी लिहिली होती. त्यामध्ये त्यानं त्याच्या वरिष्ठांवर कामाच्या ठिकाणी शोषणाचा आरोप केला होता. पोलिसांनी म्हटलं की के. अरविंद याच्या भावाच्या तक्रारीवरुन हा एफआयआर नोंदवण्यात आला. 

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एफआयआरमध्ये भाविश अग्रवाल, सुब्रत कुमार दास जे ओलामध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत, त्यांच्यासह इतरांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 नुसार एफआयआर नोंदवण्यात आला. तक्रारीत अरविंदच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या जवळपास 17.46 लाख रुपयांच्या कथित अनियमिततांचा देखील उल्लेक आहे. 

के. अरविंद यानं कथितपणे त्याच्या घरी असताना विष प्यायलं होतं, ही घटना 28 सप्टेंबरला घडली होती. त्यानंतर त्याला एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याचा जीव वाचला नव्हता. त्यानंतर कुटुंबाला एक नोट आढळली होती. ज्यामध्ये कामाच्या ठिकाणी सतत होणारं शोषण आणि ओलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला होता. 

के. अरविंद यांच्या कुटुंबानं आरोप केला की कंपनीचा एचआर विभाग अरविंदच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेल्या रकमेबाबत स्पष्टीकरण देण्यात अयशस्वी ठरला. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एफआयआरमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी या बाबतची चौकशी सुरु अशल्याची माहिती दिली. 

ओलाकडून या प्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान गेल्या महिन्यात जपनाची दिग्गज कंपनी सॉफ्टबँकद्वारे ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीतून त्यांची भागीदारी कमी करण्यात आली होती. त्यानंतर ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर घसरले आहेत. 
 
5 सप्टेंबरला सेबीकडे केलेल्या फायलिंगनुसार सॉफ्टबँकची गुंतवणूक शाखा एसव्हीएफ II ऑस्ट्रिच एलएलसीनं 15 जुलै 2 सप्टेंबर दरम्यान ओला इलेक्ट्रिकचे 94.9 दशलक्ष शेअरची विक्री केली आहे. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर 2.14 रुपयांनी घसरुन 54.94 रुपयांवर आला. 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! CNG च्या दरात पुन्हा दीड रुपयांची वाढ; आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! CNG च्या दरात पुन्हा दीड रुपयांची वाढ; आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?
मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित पर्याय, दरमहा फक्त 5000 रुपये जमा करा, 16 लाख रुपये मिळवा, नेमकी काय आहे योजना? 
मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित पर्याय, दरमहा फक्त 5000 रुपये जमा करा, 16 लाख रुपये मिळवा, नेमकी काय आहे योजना? 
Modern Office Setup Cost : 100 कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक ऑफिस उभारायला किती खर्च येतो? फर्निचर, इंटीरियर ते स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंत जाणून घ्या संपूर्ण बजेट
100 कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक ऑफिस उभारायला किती खर्च येतो? फर्निचर, इंटीरियर ते स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंत जाणून घ्या संपूर्ण बजेट
अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री,  पवई पोलिसांची मोठी कारवाई, 4500 लिटर डिझेल जप्त, तीन आरोपींना अटक
अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री,  पवई पोलिसांची मोठी कारवाई, 4500 लिटर डिझेल जप्त, तीन आरोपींना अटक

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Lalit Modi : आयपीएलचा संस्थापक आणि पळपुटा ललित मोदी बनला ब्रिटनचा नागरिक, फोटो शेअर करत म्हणाला 'हे नवं घर'
आयपीएलचा संस्थापक ललित मोदी बनला ब्रिटनचा नागरिक, फोटो शेअर करत म्हणाला 'हे नवं घर'
Devendra Fadnavis Chhat puja: छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
Arrest and Criminal Case Rules : देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Team India : गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Embed widget