एक्स्प्लोर

UPI व्यवहाराबाबत नवा नियम, आता 500000 रुपयांपर्यंत करता येणार डिजिटल पेमेंट!

सध्या एनपीसीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत यूपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहाराची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

NPCI: सध्या देशात यूपीआय ट्रान्जेक्शनचे (UPI Transaction) प्रमाण वाढले आहे. सध्या स्मार्टफोनचे प्रमाण वाढल्यामुळे यूपीआयच्या ट्रान्जेक्शनच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आजकाल प्रत्येकजण छोठे-मोठे आर्थिक व्यवहार तसेच पैसे ट्रान्सफर करण्यासाठी यूपीआयचा वापर करत आहेत. एखाद्या मोठ्या दुकानापासून ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या दुकानापर्यंत प्रत्येकाकडे आज  यूपीआय पेमेंटसाठी क्यूआर कोड लावलेला असतो. मात्र यूपीआयचे व्यवहार करण्यासाठी असलेली डेली लिमीट अनेकांसाठी अडचणीचा विषय ठरत होती. तशी तक्रार अनेकजणांकडून केली जात होती. यावरच आता नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक मोठा निर्णय घेतला 16 सप्टेंबरपासून यूपीआयच्या रोजच्या व्यवहारात वाढ करण्यात आली आहे. 

ऑगस्टमध्ये बदल करण्याचे आरबीआयचे संकेत 

एनपीसीआयने (National Payments Corporation of India) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) निर्देशानुसार 16 सप्टेंबरपासून अनेक भागांत यूपीआय ट्रान्जेक्शनच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 ऑगस्ट रोजी आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली होती. या बैठकीनंतर आरबीआयने यूपीआयच्या व्यवहाराची मर्यादा वाढवण्याचे संकेत दिले होते. आता हा याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून एनपीसीआयने सर्व यूपीआय अॅप, पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स तसेच बँकांना याबाबत माहिती दिली आहे. सर्वांनी आपल्या सिस्टिममध्ये अपडेट करावे, अशी सूचनाही यूपीआयने केली आहे. 

आता पाच लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार

एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार नव्या नियमानुसार आता कर भरण्यासाठी (Tax Payment) यूपीआयच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत ट्रान्जेक्शन करता येणार आहे. रुग्णालयाचे बील (Hospital Bill), शैक्षणिक संस्थांची फी (Educational Fees), आयपीओ (IPO) आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट स्कीम्स (Retail Direct Schemes) या सारख्या व्यवहारांसाठीही आता 5 लाख रुपयांचे यूपीआय ट्रान्जेक्शन करता येईल.

एनपीसीआयने याआधी डिसेंबर 2021 आणि डिसेंबर 2023 मध्ये यूपीआय ट्रान्जेक्शनच्या मर्यादेत बदल केला होता. सध्या एनपीसीआयने एकाच खात्यावरून अनेक लोकांना व्यवहार करण्याची सोय यूपीआय सर्कलच्या (UPI Circle) माध्यमातून करण्यात आली आहे.

बँकादेखील व्यवहाराची मर्यादा निश्चित करू शकणार 

सध्यातरी वर नमूद केलेले व्यवहार वगळता अन्य सर्व प्रकारच्या यूपीआय ट्रान्जेक्शनवर एका दिवसासाठी एक लाख रुपयांची ट्रान्जेक्शन लिमीट आहे. असे असले तरी प्रत्येक बँक स्वत:ची अशी व्यवहाराची मर्यादा निश्चित करू शकतात. अलाहाबाद बँकेची यूपीआय व्यवहाराची मर्यादा 25,000 रुपये आहे. है. तर  एचडीएफसी बँक (HDFC Bank) आयसीआयसीआय बँकेची (ICICI Bank) यूपीआय व्यवहाराची मर्यादा ही एक लाख रुपये आहे. कॅपिटल मार्केट, कलेक्शन, विमा, परदेशी व्यवहार (Foreign Inward Remittances) यासाठी ही मर्यादा प्रत्येक दिवसासाठी दोन लाख रुपये आहे.

हेही वाचा :

पैसे ठेवा तयार! लवकरच येणार स्विगाचा मोठा आयपीओ, पैसे कमवण्याची जबरदस्त संधी

गोंधळ गडबड नको! सोमवारी फक्त 'या' तीन शेअर्सवर ठेवा नजर, होऊ शकतो भरभक्कम प्रॉफिट

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी

व्हिडीओ

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
Embed widget