एक्स्प्लोर

New T+1 Settlement Process : 19 वर्षानंतर शेअर बाजारात मोठे बदल; T+1 सेटलमेंट नियम होणार लागू

New T+1 Settlement Process: बाजार नियामक सेबीने जवळपास 19 वर्षांनंतर शेअर बाजारात मोठे बदल मंजूर केले आहेत. आजपासून लागू होणार आहेत.

New T+1 Settlement Process : बाजार नियामक सेबीने (SEBI) जवळपास 19 वर्षांनंतर शेअर बाजारात मोठे बदल मंजूर केले आहेत. हे बदल आजपासून म्हणजेच, 25 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहेत. T+1 म्हणून नवीन सेटलमेंट लागू झाल्यानंतर, जो गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करतो किंवा विकतो त्याला एक दिवसाच्या आत आत पैसे दिले जातील.

शेअर बाजारातील प्रचंड चढउतारांदरम्यान शुक्रवारपासून T+1 सेटलमेंटचा नवीन नियम लागू होणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) या दोन्हींवर आता गुंतवणूकदारांना शेअर्स आणि पैशांचे हस्तांतरण एका दिवसात केलं जाईल.

सरकार आणि सेबी दीर्घकाळापासून T+1 सेटलमेंट नियम लागू करण्याचा विचार करत होते. परंतु परदेशी गुंतवणूकदारांनी त्याला आक्षेप घेतला. सध्या, T+2 सेटलमेंट सिस्टम दोन्ही एक्सचेंजवर लागू आहे, जी 2003 मध्ये सुरू करण्यात आली होती. या नियमानुसार, शेअर्स आणि पैसे हस्तांतरित करण्यासाठी दोन दिवस लागतात. पूर्वी T+3 प्रणाली होती, ज्याला तीन दिवस लागायचे. 

हा फॉर्मुला नेमका काय?

सेटलमेंट सिस्टम म्हणजे, शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीवर तुमच्या खात्यात स्टॉक किंवा पैसे हस्तांतरित करणं. सध्या, एक्सचेंजेस T+2 प्रणालीचं अनुसरण करतात. याचा अर्थ पैसे किंवा शेअर्स तुमच्या ऑर्डर प्लेसमेंट खात्यात येण्यासाठी दोन दिवस लागतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही सोमवारी शेअर विकला तर दोन दिवसांनी तुमच्या डिमॅट खात्यात पैसे येतील. त्याचप्रमाणे तुम्ही शेअर्स खरेदी केले असतील तर दोन दिवसांनी तुम्हाला शेअर्स मिळतील. 

आता काय बदलेल?

शुक्रवारपासून बाजारात T+1 सेटलमेंट प्रणाली लागू केल्यामुळे, तुम्ही शेअर्स खरेदी किंवा विक्री कराल त्या दिवशीच्या दुसऱ्या व्यावसायिक दिवशी तुमच्या खात्यात पैसे किंवा स्टॉक ट्रान्सफर केले जातील. सुरुवातीला, बाजार मूल्यांकनानुसार तळाशी ठेवलेले 100 शेअर्स T+1 मध्ये समाविष्ट केले जातील. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी 500 नवीन स्टॉक जोडले जातील जोपर्यंत सर्व समाविष्ट होत नाहीत.

...म्हणून नव्या यंत्रणेची गरज

सेबीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या प्रणालीचा प्रस्ताव मांडताना सांगितले होते की, सेटलमेंट वेळ कमी करून गुंतवणूकदारांना शेअर्स आणि पैसे लवकर भरता येतील. यामुळे गुंतवणूकदारांच्या ट्रेडिंग खात्यातील मार्जिन केवळ एका दिवसासाठी ब्लॉक होईल आणि इक्विटी मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वाढण्यास मदत होईल. सेबीने सांगितले की, ही प्रणाली सर्व प्रकारच्या सुरक्षा व्यवहारांमध्ये केली जाईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
Gold Silver Rate: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा येणार चढ-उतार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या काय आहेत आजचे दर
सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा येणार चढ-उतार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या काय आहेत आजचे दर
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट

व्हिडीओ

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Atharva Sudame Shares Apologizing Video For Kushal Badrike Allgeations: 'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Gokul Election Result 2026: गोकुळचा निकाल बाजूने लागला पण अचानक 'अदृश्य' शक्ती सक्रिय, दगाफटक्याची कुणकुण लागताच सतेज पाटील-राजू शेट्टी मतमोजणी केंद्रावर पोहोचले अन्...
गोकुळचा निकाल बाजूने लागला पण अचानक 'अदृश्य' शक्ती सक्रिय, दगाफटक्याची कुणकुण लागताच सतेज पाटील-राजू शेट्टी मतमोजणी केंद्रावर पोहोचले अन्...
Embed widget